Canacona: काणकोणात खासगी विद्यालयाचे कार्यालय फोडले, 67 हजारांची रोकड लंपास

काणकोणात सध्या भुरट्या चोरांनी खासगी शैक्षणिक संस्थांना लक्ष्य करण्याचे सत्र अवलंबले आहे.
Canacona Theft Case
Canacona Theft Case Dainik Gomantak
Published on
Updated on

काणकोणात सध्या भुरट्या चोरांनी खासगी शैक्षणिक संस्थांना लक्ष्य करण्याचे सत्र अवलंबले आहे. बुधवारी रात्री पैंगीण येथील श्री श्रद्धानंद विद्यालयाचे कार्यालय फोडून कपाटातून 67 हजारांची रोकड चोरांनी लंपास केली.

कार्यालयाच्या दरवाजाची कडी काढून त्यांनी ही कपाटे फोडली, असे श्रद्धानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सीमा प्रभूगावकर यांनी सांगितले.

चोरीची घटना घडल्यानंतर आज काणकोण पोलिसांनी श्वानपथक बोलावून तपासाला चालना दिली. मात्र, अज्ञात चोरट्यांचा तपास लागला नाही.

दोन दिवसांपूर्वी माशे येथे सत्यवती सोयरू आंगले उच्च माध्यमिक विद्यालयातही अशाच प्रकारे चोरीची घटना घडली होती. मात्र, चोरांनी तोंडावर मास्क घातल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फोटोवरून त्यांची ओळख पटू शकली नाही. या शैक्षणिक संस्थेतून त्यांनी 15 हजार रुपयांची रोकड आणि एक मोबाईल पळविला.

या चोरांचा संपूर्ण कारनामा विद्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, त्यांनी तोंडावर मास्क घातल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही, असे पोलिस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी सांगितले.

असोळणा येथील रेजिना मार्टिन्स येथील शैक्षणिक संस्थेत पहिल्यांदा चोरी झाल्यानंतर पुढे हे चोरीचे सत्र सुरूच राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Damu Naik On Babush Office
Rudolf Fernandes
Santa Cruz BJP Candidate
14 Electricity Employees Suspension Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com