Gomantak Swasthyam Prashanmanjusha 2023 : गोमन्‍तक स्वास्थ्यम प्रश्‍नमंजूषा’ उद्यापासून; लाखोंची बक्षिसे

वाचकांचे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आरोग्य वाढावे हा उद्देश
Gomantak Swasthyam Prashanmanjusha 2023
Gomantak Swasthyam Prashanmanjusha 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Gomantak Swasthyam Prashanmanjusha 2023 : ‘गोमन्‍तक’तर्फे गोव्यातील सर्व वयोगटाचे वाचक व शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘गोमन्‍तक स्वास्थ्यम प्रश्‍नमंजूषा 2023’ ही योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश वाचकांचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्य वाढीस लागावे, हा आहे.

ही स्पर्धा 1 मार्च ते 29 मे या कालावधीमध्ये होणार असून, यामध्ये 10 ग्रॅम सोन्याचे मेडल, स्मार्ट वॉच व सायकली, विमान प्रवास, स्‍पोर्टस्‌ शूज/हेल्‍मेट, हेल्‍थ प्रोडक्‍टस्‌, वॉटर बॉटल्‍स आणि कोलगेट हेल्‍थ प्रोडक्‍टस्‌ अशा लाखो रुपये किमतीच्‍या, 1900 पेक्षा जास्त बक्षिसांचा समावेश आहे.

Gomantak Swasthyam Prashanmanjusha 2023
आरोपी पकडले खरे पण माझे पैसे कोण देणार? गोव्यात लुबाडणूक झालेल्या 'त्या' जपानी पर्यटकाचा प्रश्न

अशी आहे योजना...

ऑफलाईन सहभागासाठी नेहमीप्रमाणे ‘गोमन्‍तक’च्या अंकातील सदर वाचा, प्रश्नाच्या उत्तराचे कुपन कापून चिकटवा व बक्षिसे जिंका ही कार्यपद्धती राहील.

यासाठी अंकात स्वास्थम विषयावर आधारित याच नावाचे एक सदर प्रसिद्ध केले जाईल. एकूण 90 पैकी 80 बरोबर उत्तरांची कुपन्स बक्षिसांसाठी ग्राह्य धरली जातील.

बक्षिसांमध्ये वाचकांना आकर्षण वाटेल अशा (पहिले) 10 ग्रॅम सोन्याचे मेडल-1, (दुसरे) स्मार्ट वॉच-2, (तिसरे) सायकली : 3, (चौथे) विमान प्रवास तिकीट-3, (पाचवे) स्पोर्टस्‌ शूज किंवा हेल्मेट-35, (सहावे) आरोग्य उत्पादने-40, (सातवे) वॉटर बॉटल्स - 40, (आठवे) उत्तेजनार्थ - कोलगेट हेल्‍थ प्रोडक्‍टस्‌ -1800 अशा लाखो रुपये किमतीच्‍या 1900 पेक्षा जास्त बक्षिसांचा समावेश केलेला आहे.

Gomantak Swasthyam Prashanmanjusha 2023
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी उत्तरेत भाजपचे काम सुरू

‘गोमन्‍तक’तर्फे समाजातील विविध घटकांसाठी आयोजित केलेल्या विविध योजनांना नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळतो. त्याच धर्तीवर गोव्यातील सर्व वयोगटाच्या वाचकांसाठी व शालेय विद्यार्थ्यांसाठी ही योजना ‘गोमन्‍तक’तर्फे सुरू होत आहे. याद्वारे ज्ञान वाढवून त्यांना बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल.

योजना 1 मार्चला सुरू होऊन 29 मे रोजी संपेल. एकूण 90 दिवसांची ही योजना असेल. ही योजना केवळ ऑफलाइन पद्धतीने होईल. प्रश्‍‍नमंजूषेतील 90 पैकी फक्त 80 उत्तरांची कुपन्‍स चिकटवून प्रवेशिका दि. 15 जून 2023 पर्यंत गोमन्‍तकच्‍या कार्यालयात किंवा प्रवेशिका शाळेत ठेवलेल्‍या गोमन्‍तक बॉक्‍समध्‍ये जमा कराव्‍यात.

कार्यालयाचे पत्ते : पणजी : गोमन्‍तक प्रा. लि., गोमन्‍तक भवन, सांत इनेज-पणजी, गोवा 403001. फोंडा : डॉ. आल्‍मेदा बिल्‍डिंग, फोंडा-गोवा 403401. मडगाव : याजी हाऊस, 185 तळमजला, दुकान नं. 1, वर्दे वालावलीकर रोड, मडगाव-गोवा 403601.

अधिक माहितीसाठी संपर्क : भारत पोवार : 9881099247 (तिसवाडी/वास्‍को), संजय पाटील : 9922903020 (फोंडा/सत्तरी), मारुती वाघमारे : 8421369336 (सासष्‍टी/केपे/सांगे/काणकोण), राजेश दापले : 9850906086 (बार्देश/पेडणे/डिचोली).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com