Gomantak Gaud Maratha Community: गौड मराठा समाज निवडणूक वादाच्या भोवऱ्यात; विरोधी गटाचे आरोप

Gomantak Gaud Maratha Community Election: संघटनेच्या अध्यक्षपदी विश्र्वास गावडे यांची झालेली निवड बेकायदेशीर असल्याचा दावा
Gomantak Gaud Maratha Community Election: संघटनेच्या अध्यक्षपदी विश्र्वास गावडे यांची झालेली निवड बेकायदेशीर असल्याचा दावा
Gomantak Gaud Maratha CommunityDainik Gomanatk
Published on
Updated on

मडगाव: गोमंतक गौड मराठा समाजाची आजची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली. या संघटनेच्या अध्यक्षपदी विश्र्वास गावडे यांची झालेली निवड बेकायदेशीर असल्याचा दावा आज प्रकाश वेळीप विरोधी गटाकडून करण्यात आला. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांत तक्रार देण्यात आली असून या निवडणूक प्रक्रियेला सोसायटी रजिस्ट्रारकडे आव्हान देण्यात येणार असल्याचा इशारा गोविंद शिरोडकर यांनी दिला आहे.

प्रत्येक वर्षी नाग पंचमीच्या दिवशी या संघटनेचा वर्धापनदिन साजरा केला जात असून त्याच दिवशी त्यांची आमसभाही होते. आजच्या आमसभेवेळी निवडणूक ठेवण्यात आली होती. सदस्यांना जी आमसभेची नोटीस दिली होती, त्यात ही निवडणूक दुपारी ३ वाजता होणार असे नोंद केले होते. मात्र, त्याऐवजी ती दोन वाजता घेऊन विद्यमान अध्यक्ष गावडे यांची अध्यक्षपदी पुन्हा निवड केल्याने वाद सुरू झाला. त्यामुळे बाळ्ळी येथील आदर्श संस्थेच्या सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

Gomantak Gaud Maratha Community Election: संघटनेच्या अध्यक्षपदी विश्र्वास गावडे यांची झालेली निवड बेकायदेशीर असल्याचा दावा
Ponda News : युवा वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी गोमंतक गौड मराठा समाजातर्फे फोंड्यात विविध उपक्रम

निवडणूक नियमानुसारच; गावडे

ही निवडणूक प्रक्रिया दुपारी २ वाजता सुरू केली जाईल, अशी जाहीर नोटीस वृत्तपत्रातून दिली होती. त्याप्रमाणे प्रक्रिया सुरू केली. प्रकाश वेळीप यांना यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून नेमले होते. त्यांनी नियमानुसार प्रक्रिया पूर्ण केली. सभासदांनी माझे नाव अध्यक्षपदासाठी सुचविल्यावर माझ्या नावाची घोषणा केली गेली. गोविंद शिरोडकर म्हणतात तशी तीन वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू होणार, अशी कुणीही नोटीस दिली नव्हती. त्यांच्याकडे ही नोटीस कशी आली हे फक्त तेच सांगू शकतात, असे विश्र्वास गावडे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com