लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष लागले तयारीला; ‘गोमन्तक’ टीव्हीवर ‘बल्कांव’ मध्ये मते व्यक्त

आमचा पक्ष राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय आणि स्वतःची ध्येये शेवटी, या तत्त्वावर चालतो : गिरीराज वेर्णेकर
Gomantak Balkav On loksabha election 2024
Gomantak Balkav On loksabha election 2024Dainik Gomantak

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. त्यामुळे राज्यातील कॉंग्रेस पक्ष बांधणीला वेग आला असून पहिल्यांदाच कॉंग्रेसकडून बूथ स्तरावरून पक्ष संघटन मजबूत करण्याचे कार्य सुरू असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विरियतो फर्नांडिस यांनी सांगितले.

राज्यातील प्रमुख भाजप, कॉंग्रेस, आरजी, गोवा फॉरवर्ड तसेच इतर पक्ष लोकसभेच्या अनुषंगाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. लोकसभेच्या अनुषंगाने गोमन्तक टीव्हीवरील ‘बल्कांव’ या विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

या चर्चेत कॉंग्रेसचे सरचिटणीस विरियतो फर्नांडिस, भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर, गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत, ‘आरजी’चे विश्‍वेश नाईक यांनी सहभाग घेतला होता.

गिरीराज वेर्णेकर म्हणाले, आमचा पक्ष राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय आणि स्वतःची ध्येये शेवटी, या तत्त्वावर चालतो. भाजपचे कार्य बुथ स्तरापासून सुरू होते.

भाजपने सत्तेत आल्यापासून जनहिताच्या अनेक गोष्टी केल्याने २०२४ मध्ये जनता पुन्हा देशभरात तीनशेहून अधिक जागा देईल. बहुतांश पक्ष भाजप विरोधात एकत्र येत आहेत.त्यामुळे जनतेचा विश्‍वास दिसतो,असे त्यांनी सांगितले.

Gomantak Balkav On loksabha election 2024
Dangerous Tree: रस्ते अपघात रोखण्यासाठी महामार्गालगतची धोकादायक झाडे हटवावीत; काँग्रेस शिष्टमंडळाची मागणी

आम्हाला गृहित धरू नये !

निवडणुका येतात जातात, परंतु आम्ही सातत्याने गोमंतकीय जनतेसाठी काम करत आहोत. राजकारणी व्यक्तींनी आता पूर्णवेळ समाजकार्यात असणे गरजेचे झाले आहे.

आम्ही लोकसभेला एखाद्या पक्षाला पाठिंबा देऊ , असे समजून आम्हाला कोणीही गृहित धरू नये.

परंतु आमचे नेते विजय सरदेसाई यांचे मत आहे, की सर्व विरोधकांनी एकत्रितपणे गोव्याच्या हितासाठी कार्य करणे गरजेचे आहे,असे दुर्गादास कामत यांनी सांगितले.

विद्यमान खासदार ठरताहेत अपयशी !

राज्यातील विद्यमान खासदार गोव्याच्या स्थानिक प्रश्‍नांबाबत आवाज उठवणे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, परंतु तसे होताना दिसत नाही.

लोकसभेत आम्ही पूर्ण तयारीनिशी उतरण्यासाठी कार्य करत असून जर आम्हाला युतीची ऑफर आली तर त्याचा निर्णय आमचे केंद्रीय समितीच्या बैठकीत घेण्यात येईल. सद्यस्थितीत आम्ही जनतेत असून आम्हाला जनतेचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

आमच्याकडे निधी कमी आहे, मात्र आम्ही जनतेच्या प्रश्‍नांसाठी खंबीरपणाने लढा देत असल्याचे ‘आरजी’चे विश्‍वेश नाईक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com