Dangerous Tree
Dangerous TreeDainik Gomantak

Dangerous Tree: रस्ते अपघात रोखण्यासाठी महामार्गालगतची धोकादायक झाडे हटवावीत; काँग्रेस शिष्टमंडळाची मागणी

महामार्गालगत असलेली धोकादायक झाडे हटवावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Published on

Dangerous Tree: काही दिवसांपूर्वी नावेली येथे महामार्गावर चालत्या वाहनावर झाडाची फांदी कोसळून दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. यानंतर महामार्गालगत असलेली धोकादायक झाडे हटवावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Dangerous Tree
Bicholim Fire News: डिचोलीतील भीषण आगीत कोटीची हानी

यासंदर्भात काँग्रेस पक्षाने महामार्ग आणि रस्त्याच्या कडेला असलेली धोकादायक झाडे तोडण्यासाठी यंत्रणा उभारण्याचे आवाहन जिल्हा अधिकाऱ्यांना केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी दिपक देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक पार पडली. बैठकीला दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसचे प्रमुख सॅव्हियो डिसिल्वा, एव्हरसन वेल्स आणि रीबेलो यांच्या काँग्रेसच्या शिष्टमंडळाने हजेरी लावली होती.

रस्ते अपघात कमी करण्यासाठी धोकादायक झाडे हटवणे गरजेचे आहे. महामार्गालगतच्या झाडांवर लक्ष ठेवण्यासाठी तज्ज्ञांची टीम स्थापन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचे स्वागत करून काँग्रेसने सरपंचांनाही पॅनेलवर घ्यावे, अशी मागणी केली आहे.

यावेळी पावसाळ्यातच नव्हे तर वेळोवेळी झाडे छाटली जावीत किंवा तोडली जावीत यासाठी अधिकाऱ्यांनी यंत्रणा उभारावी अशी इच्छा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com