Altaf Shah Sayyed: घोगळ खून प्रकरणी नवी अपडेट! संशयित 'अल्ताफ'ची मोठी माया उघड; दुबईत 'सुपरमार्केट' असल्याची माहिती समोर

Altaf Shah Sayyed Gogol Crime: अल्ताफला अटक केल्यानंतर त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. सोमवारी कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.
Altaf Shah Sayyed Gogol Crime
Altaf Shah Sayyed Gogol CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: घोगळ येथील सुन्नी गुलिस्तान मशिदीचे उपाध्यक्ष अली कलंदर खानजादे यांच्या खून प्रकरणाने संपूर्ण गोवा हादरला आहे. या प्रकरणात पोलिस कोठडीत असलेल्या अल्ताफ शाह सय्यद याचे दुबई कनेक्शन उघडकीस आले असून, तपासाला नवे वळण मिळाले आहे.

पोलिस तपासात दुबईत त्याचे सुपरमार्केट असल्याची माहिती समोर आली आहे. काही वर्षांपूर्वी मडगावात बसमध्ये साधा कंडक्टर म्हणून काम करणाऱ्या अल्ताफने अल्पावधीत मोठी संपत्ती जमवली. एवढी प्रचंड माया त्याच्याकडे आली तरी कुठून, असा प्रश्न आता पोलिसांनाही पडला आहे.

अल्ताफला अटक केल्यानंतर त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. सोमवारी कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे.

तपासात अल्ताफ वारंवार दुबईला जात असल्याचेही उघड झाले आहे. मात्र तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात असल्याने पोलिसांनी याबाबत मौन बाळगले आहे. एकंदर, या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून पुढील तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या खून प्रकरणी अल्ताफला गेल्या आठवड्यात मंगळवारी बंगळुरू विमानतळावर जेरबंद करण्यात आले होते.

Altaf Shah Sayyed Gogol Crime
Gogol Mosque Crime: खुनानंतर घोगळमध्ये तणावाचे वातावरण! गुलिस्तान मशिदीला ठोकले टाळे; आणखी 6 जणांच्या आवळल्या मुसक्या

दुबईहून परतताच त्याला विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर गोव्यात आणून दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. छातीत कळा येत असल्याची तक्रार केल्यानंतर त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले होते; मात्र डॉक्टरांनी डिस्चार्ज दिल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात उभे केले.

Altaf Shah Sayyed Gogol Crime
अली खानजादे खून प्रकरण, अल्ताफला आणले गोव्यात; छातीत वेदनांची तक्रार, इस्पितळात दाखल

३० जानेवारी रोजी खुनाच्या घटनेने हादरले मडगाव

३० जानेवारी रोजी शुक्रवारच्या नमाजनंतर अली कलंदर खानजादे यांचा पोटात चाकू खुपसून खून करण्यात आला होता. मशिदीच्या समितीवर ताबा मिळवण्याच्या वादातून हा थरारक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी अक्रम खान यांच्यासह आलम सय्यद, लतीफ सय्यद, उबेद्दुला मकंदर, सक्रुद्दिन शेख, हुसेन खान, निजामुद्दीन सय्यद आणि साहिल कन्वी उर्फ स्पाकी या आठ जणांना अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com