गोव्याचा पर्यटन उद्योग हळूहळू सावरतोय

देशी पर्यटक वाढले: मात्र विदेशी पर्यटकांच्‍या संख्‍येत घट; तरीही हंगाम समाधानकारक
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak 
Published on
Updated on

पणजी: खाण आणि पर्यटन उद्योग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. गेल्या सहा-सात वर्षांपासून खाण उद्योग पूर्णपणे बंद आहे. यामुळे सद्य:स्थितीत पर्यटन उद्योगच तारणहार ठरला आहे. कोरोना महामारीमुळे गेले दोन पर्यटन हंगाम वाया गेले. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेला पर्यटन उद्योग महिन्यांपूर्वी पूर्णपणे उघडण्यात आला. यावर्षीचा हंगाम देशी पर्यटकांमुळे सावरला असल्याचे दिसून येत आहे. ब्रिटनमधील कोरोनाचा कहर आणि युक्रेन-रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे विदेशी पर्यटकांची संख्या रोडावली आहे. पण देशी पर्यटकांची वाढती संख्या, विवाह सोहळे तसेच आंतरराष्‍ट्रीय इव्हेंटमुळे यंदाचा पर्यटन हंगाम समाधानकारक असल्याची माहिती गोवा ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश शाह आणि हॉटेल उद्योजक गौरीश धोंड यांनी दिली.

Goa Tourism
शिवोलीतील ‘तो’ स्टॉल बेकायदेशीर

उत्तर गोव्यातील कळंगुट, बागा, मोरजी, हरमल आदी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात देशी पर्यटकांची संख्या दिसत असली तरी विदेशी पर्यटकांची संख्या रोडावल्याचे दिसून येत आहे. राज्यात येणाऱ्या विदेश पर्यटकांमध्ये ब्रिटन आणि रशियन पर्यटकांचा भरणा अधिक असतो. कोरोना महामारीचे अद्यापही सुरू असलेला प्रकोप आणि युक्रेन - रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा पर्यटनावर परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्तर गोव्यासह दक्षिण गोव्यातील कोलवा, माजोर्डा, आगोंद आदी किनाऱ्यांवरील विदेशी पर्यटकांची संख्‍या घटली आहे.

सध्या राज्यात येणाऱ्या पर्यटकांमध्ये देशी विशेषतः गुजरात, मुंबई, पंजाब, हैदराबाद, कर्नाटक राज्यातील लोकांची संख्या अधिक आहे. शाळांना पडलेल्या उन्हाळी सुट्यांमुळे सध्या काही किनारे गजबजले असले तरी पर्यटन उद्योगावर अवलंबून असलेल्या पूरक उद्योगांना फारसा लाभ होत नाही, अशी खंत व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय पर्यटकांची संख्या जास्त दिसत आहे. यामुळे पर्यटन उद्योगाला अधिक खर्च करण्याची क्षमता असणाऱ्या पर्यटकांची प्रतीक्षा आहे. देशातील काही राज्यातून येणारे काही उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत लोक केवळ कॅसिनो पर्यटनासाठी येतात, या पर्यटकांमुळे मोठमोठ्या हॉटेल्सना आणि काही प्रमाणात टॅक्सी व्यवसायास फायदा होत आहे. पण पर्यटन पूर्णत: रुळावर आलेले नाही.

क्रुझ बोटींवर मोठ्या प्रमाणावर गर्दी

पणजीच्या प्रवेशद्वारावर मांडवी नदी किनारी असलेल्या क्रुझ बोटींचा व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत असल्याची माहिती येथील क्रुझ व्यवस्थापकांनी दिली. इतर राज्यांतील शाळांना सुट्या पडलेल्‍या आहेत. यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आदी राज्यांतून सहकुटुंब पर्यटनास येणाऱ्यांची क्रुझ बोटींवर गर्दी होत आहे.

Goa Tourism
कोकणी 'सिनेमा' दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

यंदा व्‍यवसाय समाधानकारक: नीलेश शाह

कोरोना महामारीची ओमिक्रॉन लाट आणि युक्रेन-रशिया युद्धामुळे यंदा राज्यात ब्रिटन आणि रशियन पर्यटक आलेले नाहीत. पण देशी पर्यटकांमुळे हा हंगाम समाधानकारक जात आहे, अशी प्रतिक्रिया गोवा ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश शाह यांनी दिली. देशाबाहेर जाणाऱ्या देशी पर्यटकांनी यावेळी गोव्याला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. तसेच यावेळी लग्न सोहळ्यासाठी गोव्याला पसंती दिली गेली. याचबरोबर कॉर्पोरेट बैठका, इतर सोहळे मोठ्या प्रमाणात झाले. किनारी भागातील हॉटेल्स, टॅक्सीचालक आणि छोटे व्यापारी यांना फारसा फायदा झाला नाही. पण एकूण राज्याचा विचार करता यावर्षीचा हंगाम चांगला गेल्याचे शाह म्हणाले.

देशी पर्यटकांमुळे चांगली स्थिती: गौरीश धोंड

राज्यातील पर्यटन देशी पर्यटकांमुळे तग धरून आहे. राज्यात विदेशी पर्यटक येतात, पण त्‍यातील बहुतांश अविकसित देशांतून येत असल्याने ते अधिक खर्च करत नाहीत, अशी प्रतिक्रिया हॉटेल उद्योजक गौरीश धोंड यांनी दिली. किनाऱ्यांवरील हॉटेल्स आणि टॅक्सीचालक वगळता अन्य व्यापारी किंवा उद्योगांना विदेशी पर्यटकांचा फारसा लाभ होत नाही. उलट देशी पर्यटकांमुळे छोटे हॉटेलचालक, काजू विक्रेते, मासळीविक्रेते अशा अनेक घटकांना लाभ होतो. शिवाय देशी पर्यटक बारा महिनेही राज्यात येतात. आम्हाला बारा महिने राज्यात येणारे पर्यटक हवे आहेत. एखाद्या विशिष्‍ट घटकास फायदा देणारे पर्यटक नकोत, तर पर्यटनावर अवलंबून असलेल्या प्रत्येक घटकाला लाभ होईल, असे पर्यटक आम्हाला हवे असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com