TMC: गोवा तृणमूल काँग्रेसने काल (मंगळवारी) आपले वचन पूर्ण करण्याच्या पक्षाच्या जाहिरनाम्यावर प्रकाश टाकला. 'मुबलक पाणी आणि हरित गोवा', हा जो जाहीरनाम्याचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि सरकार बनल्यानंतर वादग्रस्त रेषीय प्रकल्प रद्द करण्याचे वचन पक्षातर्फे देण्यात आहे आहे. तृणमूल कॉंग्रेस (TMC) सत्तेत आल्यावर जाहीरनाम्यातील सर्व गोष्टी तातडीने पूर्ण करू, अशी ग्वाही तृणमूल कॉंग्रेसचे राज्यसभा सदस्य लुईझिन फालेरो (Luizinho Faleiro) यांनी दिली.
त्याचबरोबर ते माध्यमांना संबोधित करताना म्हणाले की, "आम्ही वचन देतो की सरकार स्थापन झाल्यानंतर, म्हादईचे पाणी वळवण्याच्या न्यायाधिकरणाच्या निर्णयाला आव्हान दिले जाईल आणि म्हादईच्या पाण्यावरील गोव्याचा हक्क कायम ठेवला जाईल". (TMC Latest News Updates)
त्यानंतर त्यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला. ते म्हणाले, “गोवा हे शांतता आणि शांतीचे घर म्हणून ओळखले जाते, परंतु भाजप आणि काँग्रेस या दोन्ही सरकारांच्या एकापाठोपाठ आलेल्या अपयशामुळे गोव्याचे पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि उपजीविकेची स्थिती पूर्णपणे बिघडून गेले आहे. गोवा हे कोळशाचे ठिकाण नसून पर्यटनाचे ठिकाण आहे. रेल्वे मार्गाच्या दुहेरी ट्रॅकिंगला कोणी मंजुरी दिली? बेळगावी महामार्गाच्या विस्तारीकरणाला कोणी मान्यता दिली?', असे खडेबोल देखील त्यांनी यावेळी सरकारला सुनावले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.