अमित शहांच्या घरी केजरीवाल देतात फुकट वीज

आज अरविंद केजरीवाल यांनी 'आप'च्या सर्व उमेदवारांकडून पक्षांतर न करण्याची कागदोपत्री घेतली शपथ
Arvind Kejriwal scoffs at union home minister Amit Shah in goa
Arvind Kejriwal scoffs at union home minister Amit Shah in goaDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: राज्यातील विधानसभा निवडणूक सध्या देशभर गाजत आहे. निवडणुका जश्या जवळ येत आहेत, तसे राजकीय नेत्यांचे राज्यात येणे वाढले आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात अमित शहा येऊन गेले. तसेच 4 तारखेला राहुल गांधी यांचा गोवा दौरा असणार आहे. तर काल अरविंद केजरीवाल हे गोव्यात दाखल झाले. दरम्यान आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली असून, आज अरविंद केजरीवाल यांनी 'आप'च्या सर्व उमेदवारांकडून पक्षांतर न करण्याची कागदोपत्री शपथ घेतली आहे.(Arvind Kejriwal scoffs at union home minister Amit Shah in goa)

Arvind Kejriwal scoffs at union home minister Amit Shah in goa
सामान्यांचे दुःख काँग्रेसशिवाय अन्य कोणताच पक्ष समजू शकत नाही: कामत

तसेच, अमित शाह (Union Home Minister Amit Shah) काही दिवसांपूर्वी गोवा दौऱ्यावर होते, दरम्यान त्यांनी आप आणि तृणमूल वर निशाणा साधत बाहेरचे पक्ष राज्यात येऊन अनेक खोटी अश्वासने देतात, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टोला लगावला. केजरीवाल (Arvind Kejariwal) पुढे म्हणाले "अमित शाहांनी दुसऱ्यांवर टीका करण्याआधी स्वत:च्या दिल्लीतल्या घरी जाऊन आपले वीजबिल पहावे. त्यांच्या घरी आमच्याच सरकारतर्फे मोफत वीज जाते. त्यामुळे आता ज्या दिवशी निवडणुकांचे निकाल हाती येतील, त्या दिवशी अमित शाहांना धक्का बसेल."

भ्रष्टाचार करणार नसल्याचं स्टँम्प पेपरवर दिलं लिहून ...

'गोव्याच्या जनतेसाठी आम्ही स्टँम्प पेपरवर आम्ही भ्रष्टाचार करणार नसल्याचं लिहून देणार. गोव्याच्या 18 लाख लोकांमधून आम्ही आमचे उमेदवार निवडले आहेत. काँग्रेसने गोव्यावर 25 वर्ष राज्य केलं आहे. त्याबरोबरच भाजप (BJP) हे भ्रष्टाचाराचं सरकार आहे. भाजपच्या मंत्र्यांनी नोकऱ्यांमध्ये घोटाळा केला आहे. आणि आता ही जनतेला कळून चुकले आहे. आज गोव्यात फक्त भाजप आणि आप हे दोनच पर्याय आहेत. भाजपला लोकांनी संधी दिली होती, पण त्यांनी ती संधी दवडली आहे. गोव्यामध्ये आप जिंकल्यास आम्ही गोवाकरांना स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार देणार आहोत. तसेच आम्ही कोणत्याही पक्षासोबत हातमिळवणी करणार नाही. आम्ही आमचे सर्व उमेदवार चांगले आणि स्वच्छ प्रतिमेचे दिले आहेत. '

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com