Chandrayaan-3: युरींनी चांद्रयान-3 चे श्रेय दिले नेहरूंना; विरोधी पक्षनेते, CM सावंत, मंत्री राणे काय म्हणाले?

गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी यशस्वी चांद्रयान मोहिमेबद्दल इस्त्रो आणि सोबत नेहरूंचे देखील कौतुक केले आहे.
Chandrayaan-3 Isro
Chandrayaan-3 Isro
Published on
Updated on

Opposition Leader Yuri Alemao Lauds Nehru On Isro's Chandrayaan 3 Mission : भारताचे चांद्रयान-3 (Chandrayaan 3 Mission) ने आज (बुधवार) चंद्रावर यशस्वीपणे उतरले. विक्रम लँडरने 6.04 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले. अंतराळ इतिहासातील एक ऐतिहासिक घटना म्हणून सर्व जगाने भारताचे कौतुक केले आहे.

गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी यशस्वी चांद्रयान मोहिमेबद्दल इस्त्रो आणि सोबत नेहरूंचे देखील कौतुक केले आहे.

"पंडित जवाहरलाल नेहरूंच्या दूरदृष्टीमुळे स्थापन झालेल्या इस्रोचे चांद्रयान 3 भारताला चंद्रावर घेऊन गेले. अंतराळ संशोधनाची गरज ओळखून भारताचे पहिले पंतप्रधान पं. नेहरूंनी 1962 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन समिती स्थापन केली. तीच पुढे 1969 मध्ये इस्रो झाली. भारताचे अभिनंदन!" असे ट्विट विधानसभेचे विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनी केले आहे.

"भारताच्या चांद्रयान 3 ने इतिहास रचला आहे. न्यू इंडियासाठी हा खास क्षण आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान 3 च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगबद्दल इस्रोचे हार्दिक अभिनंदन. संपूर्ण देश जल्लोष करत असून भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे!" असे ट्विट गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे.

Chandrayaan-3 Isro
चांद्रयान पावल्यें! इस्रोच्या मोहिमेत गोव्यातील कंपनीचा महत्वपूर्ण हातभार, पिळर्ण IDC त आनंदोत्सव

गोव्याचे वन, आरोग्य आणि नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी चांद्रयान 3 च्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे.

"असे काहीही नाही जे भारत साध्य करू शकत नाही. चांद्रयान 3 च्या चंद्रावर यशस्वी लँडिंगबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना सलाम करतो. विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ मोहिमांसाठी त्यांची दृष्टी आणि पाठिंबा प्रशंसनीय व प्रेरणादायी आहे. त्यांच्या दूरदृष्टीने त्यांचे कर्तृत्व देशासमोर आले आहे. अंतराळ संशोधन प्रवासात एक मोठी झेप घेणाऱ्या या उल्लेखनीय आणि अभूतपूर्व कामगिरीबद्दल मी इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतो. जय हिंद." असे ट्विट मंत्री राणे यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com