चांद्रयान पावल्यें! इस्रोच्या मोहिमेत गोव्यातील कंपनीचा महत्वपूर्ण हातभार, पिळर्ण IDC त आनंदोत्सव

भारताची महत्वकांक्षी चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे.
Chandrayaan 3 Mission
Chandrayaan 3 MissionDainik Gomantak
Published on
Updated on

Chandrayaan 3 Mission: भारताची महत्वकांक्षी चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे. चांद्रयान 3 चे लँडर चंद्रावर यशस्वीपणे लँड झाले आहे. लँडर चंद्रावर सॉफ्ट लँडींग झाल्यावर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टाळ्या वाजवत जल्लोष केला.

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान-३ मिशनने उड्डाण केले तेव्हा पिळर्ण औद्योगिक वसाहतीत देखील आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता. याचे कारण येथील एका कंपनीत चांद्रयानासाठी लागणारे काही महत्वाचे भाग निर्माण करण्यात आले आहेत.

चांद्रयान-३ ने उड्डाण केल्यानंतर किनको ग्रुपचे 700 कर्मचारी नखे चावत आणि श्वास रोखून उड्डाण पाहत होते.

किनको कामन कॉम्पोझीट हा किनको ग्रुप आणि कामन एरोस्पेस ग्रुप, अमेरिका या कंपनीचे संयुक्त भागीदारी आहे.

Chandrayaan 3 Mission
17 Minutes of Terror म्हणजे काय? चांद्रयान 3 च्या सॉफ्ट लँडिंग वेळी शेवटची 17 मिनिटे निर्णायक

कोणते भाग यानासाठी वापरले?

गोव्यातील किनको ग्रुपने यानासाठी लागणाऱ्या क्रिटिकल पार्टचा पुरवठा केला आहे. चांद्रयान-3 मोहिमेसाठी वापरल्या जाणार्‍या LVM-3 Mk4 वाहनाचा हे पार्ट भाग आहेत. यामध्ये इक्विपमेंट बे श्राउड असेंब्ली, ITSC क्लोजर प्लेट्स, कंपोझिट वायर टनल आणि बॉटम प्लेट असेंब्ली आणि कार्बन फायबर-रिइन्फोर्स्ड पॉलिमरपासून बनवलेल्या FSA केसिंग्ज यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com