Margao Session Court: वेश्याव्यवसायासाठी महिलांची खरेदी आणि पुरवठा केल्याप्रकरणी एकजण दोषी

Margao Session Court: संभाव्य ग्राहकांना भेटण्यासाठी तो दोन महिलांना घेऊन कोलवा बीचवर आला असता, त्याला पकडण्यात आले.
Court
CourtDainik Gomantak

Margao Session Court

वेश्याव्यवसायासाठी महिलांची खरेदी आणि पुरवठा केल्याप्रकरणी एकजण दोषी आढळला आहे. मडगाव अतिरिक्त सत्र न्यायालयाने याबाबत निर्णय दिला आहे. कोलवा पोलिसांनी २०२० मध्ये याप्रकरणी गुन्हा नोंद केला होता.

अतिरिक्त सत्र न्यायालयाने विजय सिंगला याप्रकरणात दोषी ठरवले आहे. दोषी सिंग वेश्याव्यवसाय नेटवर्कच्या माध्यमातून महिलांच्या संपर्कात आला. गोव्यात नोकरीच्या शोधात आलेल्या महिलांना वेश्याव्यवसायात गुंतवल्याचा आरोप त्याच्यावर होता.

दरम्यान, संभाव्य ग्राहकांना भेटण्यासाठी तो दोन महिलांना घेऊन कोलवा बीचवर आला असता, त्याला पकडण्यात आले, अशी माहिती फिर्यादीने न्यायालयात दिली.

Court
Dhargal Fatal Accident: धारगळ अपघात प्रकरणात अखेर खूनाचा गुन्हा दाखल

याशिवाय अन्य काही कलमांखाली सिंग विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता, पण पुराव्यांअभावी सिद्ध होऊ शकले नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com