दैनिक ‘गोमन्तक’च्या दिवाळी अंकाचा महाराष्ट्रात डंका; अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा प्रथम पुरस्कार जाहीर

Dainik Gomantak: मराठीतील प्रकाशकांना एकत्र आणण्यात अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे मोठे कार्य आहे.
Dainik Gomantak
Dainik Gomantak Dainik Gomantak
Published on
Updated on

Dainik Gomantak

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाकडून २०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकांचे पुरस्कार नुकतेच घोषित करण्यात आले.

यात ‘गोमन्तक’ दिवाळी अंकाला प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या कार्यकारिणीने नुकतीच या पुरस्कारांची घोषणा केली आहे. यावर्षीच्या ‘गोमन्तक’ दिवाळी अंकाला मिळालेला हा तिसरा पुरस्कार आहे.

या संस्थेतर्फे देण्यात येणारे सर्व पुरस्कार विविध गटांमध्ये विभागले आहेत. ‘गोमन्तक’ दिवाळी अंकाला ''संकीर्ण'' विभागात प्रथम पुरस्कार घोषित झाला आहे. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ ही संस्था अतिशय महत्त्वाची मानली जाते.

या संस्थेच्या सदस्यांमध्ये मराठीतील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या सर्व प्रकाशन संस्थांचा सहभाग आहे. दरवर्षी मराठीतील विविध ग्रंथ, प्रकाशकांना संस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. शिवाय दरवर्षी सर्व प्रकाशकांचे संमेलन आयोजित केले जाते.

Dainik Gomantak
Goa Extortion Case: खंडणी नव्हे, 'हायवे रॉबरी'; दिल्‍लीच्‍या व्‍यावसायिकांचा सुनियोजित पाठलाग, अनेक प्रश्न अनुत्तरीत

२८ रोजी पुण्यात सन्मान

मराठीतील प्रकाशकांना एकत्र आणण्यात अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे मोठे कार्य आहे.

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने आयोजित केलेल्या दिवाळी अंक स्पर्धेत ‘गोमन्तक’ दिवाळी अंकाला प्रथम पुरस्कार घोषित झाला असून २८ एप्रिल रोजी पुण्यात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या पुरस्कारांचे वेगळेपण म्हणजे हे पुरस्कार प्रकाशकांना दिले जातात.

यापूर्वी मिळालेले पुरस्कार

गोमन्तक’च्या दिवाळी अंकाला यावर्षी अखिल भारतीय मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई आणि बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकार संघ, नाशिक या संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. ‘गोमन्तक’च्या यशस्वी वाटचालीत आणखी एका महत्त्वाच्या पुरस्काराची भर पडली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com