Cm Pramod Sawant : गोव्याची वाटचाल योगपिठाकडे! धार्मिक, आरोग्यादायी पर्यटनावर भर

तपोभूमीवर धर्मसंरक्षणाचे कार्य चालत असून योगभूमीसाठी बाबा रामदेव स्वामीचे सहकार्य लाभत आहे.
Baba Ramdev in Goa
Baba Ramdev in Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

संजय घुग्रेटकर

Goa Tourism : तपोभूमीवर धर्मसंरक्षणाचे कार्य चालत असून योगभूमीसाठी बाबा रामदेव स्वामीचे सहकार्य लाभत आहे. त्यामुळे गोव्याची नवी ओळख योगभूमी, योगपिठ म्हणून जगाला होईल. तपोभूमी आणि पतंजलीच्या सहकार्याने गोव्याची वाटचाल योगपिठाकडे सुरू झाली आहे. राज्यात धार्मिक पर्यटनाबरोबरच आरोग्यदायी पर्यटनावर भर देण्यात येईल. भविष्यात उत्तम आरोग्याचे धडे घेण्यासाठीच पर्यटक येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तपोभूमीवर आयोजित धर्मसभेत केले.

Baba Ramdev in Goa
Goa News: 'त्या' प्रलंबित प्रश्नी मी खोर्ली आणि भोमा ग्रामस्थांच्या पाठीशी- श्रीपाद नाईक

व्यासपीठावर बाबा रामदेव, ब्रह्मेशानंदाचार्य, आचार्य बालकृष्ण, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री सुदिन ढवळीकर, ब्राह्मीदेवी, एन. पी. सिंग, डॉ. रेडाल उपस्थित होते. या शिवाय विविध संस्थाचे पदाधिकारी, देवस्थानचे अध्यक्ष, हिंदू संघटनाचे कार्यकर्ते, योगसाधक उपस्थित होते.

आरोग्यादायी पर्यटन

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, गोमंतभूमीत सर्वधर्मिय गुण्यागोविंदाने राहातात. कोणीही एकमेकांना बाधा आणत नाहीत. तरीसुद्दा कोणत्याही अमिषाला बळी पडून कोणीही धर्मपरिवर्तन करू नये. हिंदू संघटना, संस्थांनी धर्मपरिवर्तनाबाबत जागरूत राहावे. पर्यटन वाढीसाठी वेलनेस टुरिझम, आरोग्यदायी टुरिझमसाठी प्रयत्न होणार आहेत. गोव्यात येणारा प्रत्येक माणूस हा योगा शिकून जाईल, अशी व्यवस्था गोव्यात सुरू केली जाईल. गोमंतक भूमीवर ज्ञानपीठ आणि योगपीठ निर्माण होण्यासाठी सरकारचे सहकार्य असेल. क्लिन इंडिया आणि फिट इंडिया अशी संकल्पना राबविली जाईल.

धर्मसंस्कृतीचे रक्षण

हिंदू धर्म संस्कृती, सनातन संस्कृतीच्या विविध घटकांना एका सुत्रांत तपोभूमीने बांधले आहे. धर्म संस्कृतीचे रक्षण, संवर्धन तपोभूमीच्या माध्यमातून उत्तम प्रकारे चालले आहे. कोणताही भेद न करता या पावन भूमीत हिमालयापासून केरळपर्यत वीरता आणि शौर्याचा इतिहास लिहिला. शिवरायांनी पाहिलेले हिंदवी साम्राजाचे, अखंड भारताचे स्वप्न आम्ही पूर्ण करण्यासाठी आम्ही संकल्प करूया, असे प्रतिपादन स्वामी रामदेव बाबा यांनी तपोभीवर आयोजित धर्मसभेत केले.

…सनातन धर्मसाठी!

छत्रपतींनी शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या विचारांने शिवगर्जना करीत धर्मरक्षणासाठी सज्ज झाले पाहिजे. आजचे गोमंतकाचे चित्र आणि चरित्र बदलण्यासाठी, सनातन वैद्यिक संस्कृती गोमंतकात प्रस्थापित करण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे. राज्यातील हिंदू विधायकांनी (आमदारांनी) सनातन धर्मासाठी एकत्र यावे. आपल्या सार्थ संस्कृतीच्या रक्षणासाठी कार्य करावे. पोर्तुगिजांच्या काळ्याकुट्ट इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे मत ब्रह्मेशानंदाचार्य यांनी व्यक्त केले.

यावेळी सनातन धर्मरक्षणार्थ संकल्प करण्यात आला असून रामदेव बाबांनी उपस्थितांना शपथ दिली. तसेच रामदेव बाबांच्या हस्ते ब्रह्मेशानंदाचार्याचा गौरव करण्यात आला.

आचार्य बालकृष्ण म्हणाले, पवित्र भूमीत सत्यसनातन वैदिक परंपरा, मूल्यांच्या स्थापन्यासाठी, संस्कृतीच्या रक्षणासाठी शिवरायांनी कार्य केले. अशा प्रकारचे कार्य तपोभूमीतर्फेही सुरू आहे. संस्कृती, संवर्धनासाठी उत्तम कार्य चालले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com