One Day Cricket: एकदिवसीय सामन्यांच्या क्रिकेट स्पर्धेत दारुण पराभवासह गोव्याच्या मुली माघारी

१५ वर्षांखालील क्रिकेट; महाराष्ट्राविरुद्ध २६ धावांत सर्वबाद
Goa Women's Cricket Team
Goa Women's Cricket TeamDainik Gomantak

Goa Women's Cricket Team: सलग पाचव्या लढतीतील दारुण पराभवासह गोव्याच्या मुलींची १५ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यांच्या क्रिकेट स्पर्धेतील मोहीम शनिवारी संपली. महाराष्ट्राविरुद्ध डाव २६ धावांत गारद झाल्यामुळे १० विकेटने हार स्वीकारावी लागली.

Goa Women's Cricket Team
Goa Government: खात्यांतर्गत समन्वयाच्या अभावाचा विधवांना फटका

महाराष्ट्राने १० चेंडूंतच विजयाची औपचारिकता पूर्ण केली. हरियानातील गुरुग्राम येथे झालेल्या लढतीत गोव्याचा डाव १०.१ षटकांत संपुष्टात आला. फलंदाजीत गोव्याच्या एकीलाही दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. सलामीच्या नंदिनी चौहान हिने सर्वाधिक आठ धावा केल्या. सात जणी शून्यावर बाद झाल्या.

संक्षिप्त धावफलक

गोवा ः १०.१ षटकांत सर्वबाद २६ (दिशा देसाई ०, नंदिनी चौहान ८, दिलेशा डिचोलकर ०, गायत्री गावकर ०, विधी भांडारे ०, एम. नासर ०, प्रगती भोसले ०, किमया पाठक ०, शिल्पा शर्मा नाबाद ५, सान्वी गावस १, श्रुती मेस्ता नाबाद ०, निकिता सिंग ८-५, ग्रिशा कटारिया ११-५) पराभूत वि. महाराष्ट्र ः १.४ षटकांत बिनबाद २९ (ईश्वरी अवसरे नाबाद २३, नंदिनी चौहान १-०-२२-०, विधी भांडारे ०.४-०-७-०).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com