क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने मला श्रीमंत केले; गोव्यातील प्रसिद्ध मच्छीमार 'पेले'ने सांगितला अनुभव

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरने माझ्यासोबत व्हिडिओ काढला आणि समाज माध्यमांवर शेअर केला. त्यानंतर मी फारच प्रसिद्ध झालो
Sachin Tendulkar made me rich | Goa fisherman Pele experience
Sachin Tendulkar And PeleDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सचिन तेंडुलकरने मला श्रीमंत बनवले. त्याने व्हिडिओ शेअर केला आणि माझ्याकडे येण्यासाठी सेलेब्रेटींची रांग लागली, असा अनुभव बाणावलीतील प्रसिद्ध मच्छीमार फ्रान्सिस्को फर्नांडिस ऊर्फ पेले यांनी आज सांगितला.

आंतरराष्ट्रीय व्हेल-शार्क दिनानिमित्त पर्यावरण अभ्यास केंद्राने वन्यजीव विश्वस्त मंडळ, वन खाते, मत्स्योद्योग खाते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या दिनाचे निमित्त साधत राज्यातील व्हेल-शार्क संरक्षण व संवर्धन मोहिमेचीही सुरुवात करण्यात आली.

यावेळी मंचावर वनमंत्री विश्वजीत राणे, वन्यजीव संरक्षण बॅण्ड अॅम्बेसेडर दिया मिर्झा, विश्वस्त विवेक मेनन, प्रधान शोधकर्ता प्रा. बी. सी. चौधरी, मत्स्योद्योग संचालक डॉ. शमिला मोंतेरो, प्रधान मुख्य वन संरक्षक प्रवीणकुमार राघव आणि सुजीत डोंगरे उपस्थित होते.

Sachin Tendulkar made me rich | Goa fisherman Pele experience
ब्रेकअप के बाद... हृदय तुटल्यानंतर Google मधील अडीच कोटी पगाराच्या नोकरीवर मारली लाथ; सुरु केला स्वत:चा व्यवसाय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मला फोन आला. त्यानंतर सारे काही बदलले. सरकारला केलेल्या सूचनाही स्वीकारल्या जाऊ लागल्या. अगदी रॉक परवान्यांचे नूतनीकरण लवकर करा, ही पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांना केलेली सूचना अर्ध्या तासात स्वीकारली गेली, असाही अनुभव त्यांनी सांगितला.

ते म्हणाले, एकदा मासेमारीच्या अनुभवासाठी सचिन तेंडुलकर आले. तेव्हा त्यांच्या पत्नीला मी सांगितले, की तुझा पती मला गरीब करत आहे. अंजलीने मला विचारले, 'असे कसे?' मी सांगितले, 'तेंडुलकरने शतक केले, अर्धशतक केले, एवढेच नव्हे षटकार ठोकला तरी मी फटके फोडतो. त्यावेळी मला खर्च होत जातो.' त्यानंतर आम्ही पकडलेले मासे शिजवून जेवण्यासाठी माझ्याच रेस्टॉरंटमध्ये गेलो. तेथे सचिनने मला सांगितले, की तो मला आता श्रीमंत करणार आहे.

Sachin Tendulkar made me rich | Goa fisherman Pele experience
बायकोच्या अफेअरबाबत पतीला कळालं, डंबलने ठेचून तिने नवऱ्याला संपवलं

मला कसे काय ते समजले नाही. त्याने माझ्यासोबत व्हिडिओ काढला आणि समाज माध्यमांवर शेअर केला. त्यानंतर मी फारच प्रसिद्ध झालो. माझ्याकडे येण्यासाठी सेलेब्रेटींची रांग लागली. माझ्या मासेमारीच्या एका फेरीसाठी १० हजार रुपये असा दर असतो. तरीही लोक येण्यासाठी तयार असतात.

अशाच एका फेरीसाठी गेलो असताना तुटलेली जाळी, फेकलेले प्लास्टीक व कचरा दिसला. आम्ही तो गोळा करून परत आणला. जाळ्यात अडकली कासवे होती. पोलिस व वन खात्याला कळवले. त्यांनी कासवांवर उपचाराची व्यवस्था केली, असे पेले यांनी सांगितले.

सागरी वन्यजीव संरक्षण धोरण : विश्वजीत राणे

राज्यात सागरी वन्यजीव संरक्षणासाठी धोरण ठरवले जाणार आहे. यासाठी गाभा समिती निवडून काम केले जाईल, अशी घोषणा वनमंत्री विश्वजीत राणे यांनी आज मिरामार येथे केली. या समितीवर राजकारणी नव्हेत, तर या विषयातील तज्ज्ञच असतील, असेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com