Clifford Miranda: गोव्याच्या क्लिफर्ड मिरांडा यांची भारतीय U23 फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

क्लिफर्ड मिरांडा यांचा 13 जुलै 1982 रोजी गोव्यात जन्म झाला.
football Coach clifford miranda
football Coach clifford mirandaDainik Gomantak
Published on
Updated on

Clifford Miranda: माजी फुटबॉलपटू गोव्याचे क्लिफर्ड मिरांडा यांची भारतीय U23 राष्ट्रीय फुटबॉल संघाचा मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. मिरांडा यांच्या अनुभवाचा संघाला फायदा होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. मिरांडा यांनी जूनमध्ये सहाय्यक प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर ओडिशा एफसीने त्यांना जबाबदारीतून मुक्त केले होते.

क्लिफर्ड गतवर्षी ओडिशा एफसी संघात दाखल झाले होते, त्यापूर्वी भारताचे माजी आंतरराष्ट्रीय मध्यरक्षक एफसी गोवाचे सहाय्यक प्रशिक्षक होते.

क्लिफर्ड मिरांडा यांचा 13 जुलै 1982 रोजी गोव्यात जन्म झाला. व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणून त्यांची कारकीर्द उत्कृष्ट आहे. मिरांडा यांनी भारतातील विविध क्लबचे प्रतिनिधित्व केले आहे. यात डेम्पो स्पोर्ट्स क्लब आणि स्पोर्टिंग गोवा यांचा समावेश आहे.

मध्यरक्षक म्हणून त्याच्या कौशल्याची नेहमीच प्रशंसा केली जाते. 2016 मध्ये निवृत्त झाल्यानंतर, मिरांडा यांना त्यांचा मोर्चा प्रशिक्षक होण्याकडे वळवला.

football Coach clifford miranda
गोव्यात भिक्षेकऱ्यांचे रॅकेट? महिला, लहान मुलांवर जबरदस्ती; दोन वर्षात भिक्षेकऱ्यांच्या संख्येत वाढ

सुपर कप स्पर्धेच्या इतिहास विजेतेपद पटकावणारे पहिले भारतीय प्रशिक्षक हा मान क्लिफर्ड यांना प्राप्त झाला होता. ओडिशा एफसीने 2022-23 मोसमातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत सहावा क्रमांक मिळवून प्ले-ऑफ फेरीसाठी पात्रता मिळविली होती.

आयएसएल स्पर्धा संपल्यानंतर जोसेप गोम्बाऊ यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर सुपर कप व एएफसी कप प्ले-ऑफ फेरीत ओडिशा एफसी संघ क्लिफर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court FAR Dues
Ireland Cricket Head Coach Heinrich Malan Resigns
Dicholi Water Supply Issue
Suryakumar Yadav T20 Captaincy Controversy
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com