Goa Ganeshotsav:घरोघरी अधिपती गणरायाचे उत्साहात स्वागत, सर्वत्र भक्तिमय वातावरण

Goa Ganeshotsav:घरोघरी अधिपती गणरायाचे उत्साहात स्वागत, सर्वत्र भक्तिमय वातावरण
Published on
Updated on

कोरोना माहामारीनंतर दोन वर्षांनी घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात गणरायाचे आगमन उत्साही व भक्तिमय वातावरणात झाले. गणरायाचे जयघोषात स्वागत केल्यानंतर आज विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली.

कोविडमुळे गेली दोन वर्षे मनमोकळेपणाने गणेश चतुर्थी साजरी करता आली नाही. यंदा कोविड पुर्णपणे नष्ट झाला नसला तरी त्याचा प्रभाव बऱ्यापैकी मर्यादित झाला आहे. त्याशिवाय सर्वव्यवहार सुरळीतपणे सुरू झाल्याने लोकांच्या हाती पैसे खेळू लागला आहे. यामुळे बाजारातही गेले आठवडाभर तेजी दिसून आली. याच उत्साहपूर्ण वातावरणात आज गणरायाचे घरोघरी आगमन झाले. काहीजणांनी गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला गणरायाची मूर्ती आणली. तर काही जणांनी आज सकाळी गणरायाला घरात आणले.

Goa Ganeshotsav:घरोघरी अधिपती गणरायाचे उत्साहात स्वागत, सर्वत्र भक्तिमय वातावरण
Sonali Phogat प्रकरणाचा तपास CBI कडे द्या; मुलगी यशोधरा फोगाटची मागणी

आपल्या लाडक्या गणरायाला घेऊन जाण्यासाठी लहान, मोठे, श्रीमंत, गरीब, व्यापारी, गृहणी, ज्येष्ठ नागरिक, बच्चे कंपनी यांची लगबग दिसून आली. अनेक मंडळांच्या गणेश मूर्ती नेहमीप्रमाणेच भव्य आणि आकर्षक आहेत. आज भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर गणेशाची पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठापना करण्यात आली.

घरात शहरात, मंडळात गणेशाचे प्रसन्न आगमन हे प्रत्येक भाविकांच्या चेहन्यावर आनंद उमटवून गेले. आजपासून गणेशाच्या आगमनाने सर्वत्र वातावरण भारावलेले व आणि भक्तीमय दिसून आले. समाज माध्यमावर गणरायाच्या धडाकेबाज आगमनाची धूम होती. मंगलमय चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छांनी अनेकांचे व्हॉटस्अॅप स्टेटस् हाऊसफूल झाले होते.

Goa Ganeshotsav:घरोघरी अधिपती गणरायाचे उत्साहात स्वागत, सर्वत्र भक्तिमय वातावरण
Ganesh Chaturthi: बार्देश बाजार नेहमीच जपतो, ग्राहकांचे हित!

दरम्यान, आपापल्या इच्छेप्रमाणे कोणी दीड दिवसांचा, कोणी पाच तर कोणी अकरा दिवसांचे गणरायाचे पुजन करतात. त्यानुसार आज सकाळी गणरायाची विधीवत पुजा झाल्यानंतर दुपारी बालगोपाळ आरती करण्यासाठी प्रत्येकाच्या घरी जाताना दिसत होते. सर्वत्र घुमट आरतीचा निनाद, तर काही ठीकाणी टाळ मृदूंगाच्या निनादात आरती करत होते. मग संध्याकाळच्या सत्रात भजनाचा स्वर कानी पडत होता. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असे म्हणून आज भाविकांनी आपल्या गणरायाच्या दीड दिवस, म्हणा पाच दिवस, नऊ दिवस, अकरा दिवस उपासना करायला सुरुवात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com