Central Government Schemes in Goa: भाजप सरकारने संपूर्ण देशभरात नागरिकांच्या सोयीसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये 'हर घर नल से जल', 'हर घर शौचालय', 'हर घर वीज' या योजनांबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गोव्यातही अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. यापैकी 13 योजना उपक्रमात देशभरातील लहान व मोठ्या राज्यांमध्ये सुमारे दहा योजना यशस्वीपणे राबविणारे गोवा हे पहिले राज्य ठरले आहे.
केंद्रातील योजनांबरोबरच राज्यातील योजना गोव्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम आज राज्यातील स्वयंपूर्ण मित्र करीत आहे. त्यामुळे आज राज्यातील लोक स्वयंपूर्णतेकडे वळत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे विकसित भारत यात्रेच्या शुभारंभप्रसंगी केले.
यावेळी व्यासपीठावर साखळीच्या नगराध्यक्ष रश्मी, केंद्र सरकारचे अतिरिक्त कमिशनर पवनकुमार, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर व इतर नगरसेवक उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.