

मडगाव: इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींशी ओळख वाढवायची व त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवून ब्लॅकमेल करण्याचे सोहम नाईक याचे कारनामे सध्या गोव्यात गाजत असतानाच, स्विंडन- युके येथे राहणाऱ्या एका गोमंतकीय तरुणाने अशाचप्रकारे ऑनलाईन ग्रूमिंग करून १०० पेक्षा अधिक अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याने स्विंडन क्राउन न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
बीबीसी या एजन्सीने दिलेल्या बातमीत या युवकाचे नाव ट्रेव्हर फर्नांडिस असे असून त्याने फक्त युकेतीलच नव्हे तर अमेरिका, कॅनडा, नॉर्वे तसेच आयर्लंडमधील १००हून अधिक अल्पवयीन मुलींचा गैरफायदा घेतला. स्विंडन न्यायालयात त्याने आपल्या अशा ६० गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
अमेरिकेतील एका १३ वर्षीय मुलीला ऑनलाइन जाळ्यात ओढून, तिच्यावर व अन्य एका लहान मुलावर लैंगिक अत्याचार करण्यास भाग पाडल्याप्रकरणी २०२२ मध्ये १४ वर्षे कारावासाची शिक्षा झाली होती. त्याच्या पहिल्या शिक्षेनंतरही, 'नॅशनल क्राईम एजन्सी'कडून त्याच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे विश्लेषण सुरूच होते; ज्यातून आणखी गंभीर गुन्ह्यांची माहिती पुढे आली.
नोव्हेंबर २०२५मध्ये फर्नांडिसने ६७ गुन्ह्यांची कबुली दिली आणि गुरुवारी स्विंडन क्राउन कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायाधीशांनी त्याच्या गुन्ह्यांचे वर्णन करताना म्हटले की, ‘या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये, न्यायालयासमोर आलेल्या आतापर्यंतच्या सर्वांत भीषण गुन्ह्यांपैकी हे काही गुन्हे आहेत’. या गुन्ह्यांच्या बळी ठरलेल्या पीडितांचे वय १६ वर्षांपासून ते अवघ्या एका वर्षापर्यंत होते, असेही न्यायालयाने म्हटलेय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.