Goan Short Film on Netflix : गोव्याच्या सुयश कामत याने दिग्दर्शित केलेल्या आणि नेटफ्लिक्सच्या युट्यूबवर प्रकाशित झालेल्या ‘सदाबहार’ या लघुपटाची चर्चा सध्या समाजमाध्यमांवर जोरात सुरु आहे. लग्नात संगीत वाजवणाऱ्या ब्रास बॅण्डच्या एका पथकाची जरी ही गोष्ट असली तरी सुयश त्यातून (आज गोव्यात आणि जगाच्या इतर भागातही ज्वलंतपणे जाणवणाऱ्या) एका गंभीर प्रश्नाला स्पर्श करतो. माणसाची ओळख नेमकी कशावरून ठरते? आणि त्याला ('आपला माणूस' म्हणून) स्वीकारण्याचे निकष कुठले?
'सदाबहार' या लघुपटाची कथा, त्याची मांडणी या साऱ्यातूनच दिग्दर्शक म्हणून सुयशची कामगिरी ठळकपणे नजरेस येते. या लघुपटात काम करणारे सारेच कलाकार गोव्याचे आहेत. त्या प्रत्येकाने लक्षणीयरित्या आपापल्या भूमिका रंगवल्या आहेत. उत्तरप्रदेशातून उपजीविकेसाठी गोव्यात आलेल्या ब्रास बॅण्ड पथकाला ज्या दुर्दैवाला सामोरे जावे लागते ते मांडताना सुयश केवळ कथेद्वारेच नव्हे तर लघुपटासाठी त्याने वापरलेल्या आकृतीबंधाद्वारे, दृश्यांच्या प्रतिकात्मकतेद्वारे आशयात अधिक सखोलता निर्माण करतो. ‘भायले’ आणि ‘भितरले’ या कळीच्या सनातन मुद्द्याला मध्यवर्ती ठेवून, जगण्याच्या इतर प्रश्नांचेही दर्शन घडवतो.
‘नेटप्लिक्स फंड’, जगभर सिनेमाच्या वाढीसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतो. मनोरंजनाच्या क्षेत्रात अल्प प्रतिनिधित्व असलेल्यांसाठी संधी निर्माण करणे हे उद्दिष्ट बाळगून त्यांचे काम चालू असते. त्यांनी आणि अनुपमा चोप्रा यांच्या ‘फिल्म कंपेनियन’ या संस्थेने मिळून भारतातल्या लघुपट दिग्दर्शकांकडून लघुपट निर्मितीसाठी प्रस्ताव मागवले. देशभरातून सुमारे 1500 प्रस्ताव त्यांच्याकडे आले होते. प्राथमिक चाचणीनंतर त्यातून प्रथम 200 प्रस्ताव निवडले गेले. गोव्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे, 200, 50, 20 व शेवटी 10 या क्रमात निवड झालेल्या अंतिम 10 जणांमध्ये दोन दिग्दर्शक गोव्यातील होते. एक होती बरखा नाईक आणि दुसरा होता सुयश कामत. अर्थात सबंध प्रक्रियेत अंतिम दहात पोहोचणाऱ्या दिग्दर्शिकांना प्रत्येक पातळीवर ‘सिनेमा दिग्दर्शक’ आणि कथक (narrator) म्हणून स्वतःला सिध्द करायचे होतेच.
सुयशचा ‘सदाबहार’ हा लघुपट पाहताना, सिनेमा दिग्दर्शक आणि कथक (narrator) या दोन्ही स्तरांवर स्वत:ला किती प्रभावीपणे सिद्ध केले आहे याची साक्ष मिळतेच.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.