गोव्यातील भात उत्पादकांसाठी खूशखबर! शास्त्रज्ञांनी तयार केले हवामान बदल आणि पूरस्थितीचा सामना करणारे वाण
goa riceDainik Gomantak

गोव्यातील भात उत्पादकांसाठी खूशखबर! शास्त्रज्ञांनी तयार केले हवामान बदल आणि पूरस्थितीचा सामना करणारे वाण

Goa: गोव्यात मोठ्याप्रमाणात तांदळाचे उत्पादन होते. याचदरम्यान, शात्रज्ञांकडून तांदळाच्या विविध जातीच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
Published on

राज्यात सध्या पावसानं थैमान घातलं आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना तर याचा मोठा फटका बसला आहे. गोव्यात मोठ्याप्रमाणात तांदळाचे उत्पादन होते. याचदरम्यान आता, शास्त्रज्ञांनी गोव्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. शात्रज्ञांकडून तांदळाच्या विविध जातीच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. हवामानातील बदलांसह येणाऱ्या पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात पारंपरिक भाताच्या वाणांना पूराचा फटका बसण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्यातील अलीकडील पूरस्थिती पाहता अशा प्रकारच्या नवीन तांदळाच्या वाणांची नितांत गरज असल्याचे ICAR-CCARI गोव्याचे संचालक परवीन कुमार यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय 109 उच्च-उत्पादक आणि 32 हवामान-प्रतिरोधक वाण शेत आणि बागायती पिकांच्या लागवडीसाठी आवश्यक असल्याचे सांगितले. गोवा धन 5 त्यापैकी एक असल्याचे पुष्टी कुमार यांनी केली. गोवा धन 5 हा तांदळाचा एक प्रकार आहे जो गोवा धन 1 आणि CSR 27 मधील क्रॉसमधून विकसित केला गेला आहे.

गोव्यातील भात उत्पादकांसाठी खूशखबर! शास्त्रज्ञांनी तयार केले हवामान बदल आणि पूरस्थितीचा सामना करणारे वाण
Goa News : अतिवृष्टीने हिरावले सुपारीचे पीक; तीस टक्के फळे झडली

गेल्या दोन वर्षांच्या चाचणीमध्ये गोवा धन 5 जातीचे वाण पूरासारख्या कठिण परिस्थिती तग धरुन राहिले. सध्या गोव्यात पावसानं थैमान घातंल आहे. 7 जुलैच्या सकाळी 8.30 ते 8 जुलैच्या सकाळी 8.30 पर्यंत एकाच दिवसात एकूण 235 मिमी एवढा पाऊस पडला. त्यामुळे रोपे लावणीनंतर लगेचच पाण्याखाली गेली. मात्र आता विकसित करण्यात आलेले तांदळाचे वाण शेतकऱ्यांसाठी फलदायी ठरु शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com