Goa News : अतिवृष्टीने हिरावले सुपारीचे पीक; तीस टक्के फळे झडली

Betel nut crop damage : झाडेही पडली; बागायतदार हवालदिल
Goa
Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव, गोव्यात संततधार पावसामुळे सुपारी पिकावर मोठा परिणाम झाला आहे. सध्याच्या अंदाजानुसार, सुमारे ३० टक्के सुपारी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या पिकावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

सुपारी गोव्यातील प्रमुख रोख पिकांपैकी एक. सततच्या पावसामुळे सुपारीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. असंख्य फळे अकाली गळून पडली आहेत. या नुकसानीमुळे केवळ तात्काळ उत्पन्नावरच परिणाम होत नाही, तर या प्रदेशातील अनेक शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक स्थैर्यावरही संकट आले आहे.

बुरशी संसर्गाचाही धोका

अतिवृष्टीमुळे बुरशी संसर्गाचाही धोका वाढला आहे, ज्यामुळे सुपारी पिकांवर विनाशकारी परिणाम होऊ शकतो.

कृषितज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, सततच्या ओल्या स्थितीमुळे गोव्यातील मिरी आणि विविध मसाल्यांच्या पिकांवरही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांसमोरील आर्थिक आव्हाने वाढू शकतात, अशी माहिती बागायतदार ॲड. माधव प्रभुदेसाई यांनी दिली.

Goa
Russia Ukraine War: झेलेन्स्कींची मोठी घोषणा, युक्रेनला मिळणार 42 F-16 लढाऊ विमाने, आता...

जवळपास २५ ते ३०% सुपारी फळे अकाली गळून पडल्या आहेत आणि एकदा सूर्यप्रकाश पुन्हा सुरू झाल्यावर अधिक संक्रमित सुपारी पडतील आणि एकूण नुकसान जवळपास ५०% पर्यंत पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com