37th National Games: गोमंतकीयांना आता प्रतीक्षा ‘MOGA’ची

अधिकृत शुभंकराचे आज मुख्यमंत्र्यांहस्ते अनावरण
MOGA
MOGADainik Gomantak
Published on
Updated on

‘रुबीगला’ या शुभंकराचे तीन वर्षांपूर्वी 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने पणजी भव्यदिव्य कार्यक्रमात आगमन झाले होते, मात्र नंतर ती स्पर्धा रद्द झाली आणि ‘रुबीगला’ विस्मरणात गेला. आता गोव्याला 37व्या राष्ट्रीय स्पर्धेचे यजमान लाभले असून साऱ्यांना नवा शुभंकर ‘मोगा’विषयी उत्सुकता आहे.

गोव्यातील 37वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळली जाईल. यात 43 खेळांचा समावेश असून राज्यातील 28 केंद्रांवर सामने होतील. त्यानिमित्त १४ मे रोजी स्पर्धेच्या अधिकृत लोगोचे अनावरण केल्यानंतर आता रविवारी (ता. १८) क्रांतिदिनी ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये शुभंकराचे अनावरण होईल.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, राज्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे, महान अॅथलीट व भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा, लंडन ऑलिंपिकमधील ब्राँझपदक विजेती बॉक्सर एम. सी. मेरी कोम यांची उपस्थिती असेल.

MOGA
'औ' म्हणजे औरंगजेब! कोकणी अंकलिपीतील उल्लेखामुळे गोव्यात नवा वाद

क्रीडामंत्र्यांकडून ‘मोगा’चा शोध

37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या शुभंकराची उत्सुकता आहे. यासंदर्भात क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी ध्वनिचित्रफीत व्हायरल केल्यामुळे ‘मोगा’ कोण हा प्रश्न प्रत्येकजण विचारत आहेत. ‘टूगेदर वुई हॅव टू फाईंड मोगा, सगळे मेळून मोगाक सोदू’ ही टॅगलाईन वापरून क्रीडामंत्री गावडे यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा शुभंकराविषयी उत्सुकता ताणली आहे.

MOGA
Virat Kohli on Adipurush: 'आदिपुरुष' मधील डायलॉग ऐकून किंग कोहली भडकला? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओची सत्यता

तीन खेळ वगळता बाकी स्पर्धा गोव्यात

३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील ४३ पैकी ४० खेळ गोव्यात खेळले जातील. सायकलिंग, नेमबाजी व गोल्फ या खेळाच्या साधनसुविधा राज्यात नसल्याने त्यांचे आयोजन राज्याबाहेर होईल. मागील मार्च महिन्यापासून आयओए तांत्रिक समितीचे प्रमुख अमिताभ शर्मा यांच्या नेतृत्वाखालील स्पर्धेची तांत्रिक समिती विविध खेळाच्या ठिकाणांची पाहणी करत असून बहुतांश स्पर्धा केंद्रांवर शिक्कामोर्तब झाले आहे. क्रीडामंत्री गावडे यांनी मागे दिलेल्या माहितीनुसार एकूण २८ ठिकाणी स्पर्धा होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com