Goa Bank: बँक ऑफ महाराष्ट्राच्या निव्वळ व्याज उत्पन्नात वाढ!

Goa Bank: बँकेने निव्वळ व्याज उत्पन्नातही वाढ प्राप्त केली आहे, तर बँकेच्या खराब कर्जात घट झाली आहे.
Goa Bank | Bank of Maharashtra
Goa Bank | Bank of MaharashtraDainik Gomantak

Goa Bank: बँक ऑफ महाराष्ट्राने सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत मोठी झेप घेत रुपये 535 कोटींच्या निव्वळ नफ्याची नोंद केली आहे. बँकेने निव्वळ व्याज उत्पन्नातही वाढ प्राप्त केली आहे. तर बँकेच्या खराब कर्जात घट झाली आहे.

एका वर्षापूर्वी बँकेने 264 रुपयांच्या स्टँडअलोन नफ्याची नोंद केली होती. या तिमाहीत बँकेच्या एकूण उत्पन्नात 4,317 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हे प्रमाण 4,039 कोटी रुपये असे होते.

Goa Bank | Bank of Maharashtra
Goa News: काणकोणमधील वीज समस्या सोडविणार- सुदिन ढवळीकर

बँकेच्या या तिमाहीतील निव्वळ व्याज मार्जिनमध्ये 3.55% एवढी सुधारणा झाली आहे. त्याआधीच्या तिमाहीत हे प्रमाण 3.28% टक्के असे होते. तसेच निव्वळ व्याज उत्पन्नात 26% म्हणजे 1,887 कोटी रुपये अशी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हे प्रमाण 1,500 कोटी रुपये असे होते.

बँकेच्या आर्थिक कामगिरीविषयी बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक ए. एस. राजीव यांनी सांगितले की, उत्पन्न वाढीमागे अनेक घटक कारणीभूत आहेत. अनुत्पादित मालमत्तांमध्ये (एनपीए) घट करण्यातही बँकेला यश आले आहे.

Goa Bank | Bank of Maharashtra
Vishwajeet Rane : आयुर्वेदाला भरपूर वाव आणि भविष्य आहे; आरोग्य मंत्री विश्वजित राणे

गेल्या वर्षी हे प्रमाण 5.56 टक्के एवढे होते ते यावेळी 3.40 टक्क्यांवर खाली आले आहे. बँकेच्या ऑपरेटिंग नफ्यात 4.43 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे प्रमाण सप्टेंबरच्या तिमाहीत 21.64 टक्के म्हणजेच 1,462 कोटी रुपये एवढे आहे.

गृह कर्ज दरात घट

एका आश्‍चर्यकारक निर्णयाद्वारे बँकेने गृह कर्ज दरात सोमवारपासून घट केली. याबाबत व्यवस्थापकीय संचालक राजीव यांनी सांगितले की, गृह कर्ज मार्केटमधील आपला वाटा वाढविण्याच्या हेतूने हा निर्णय घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com