Zuari Bridge: कायदा सुव्यवस्थेचा फक्त बोजवारा; झुवारी पुलावर वाहतूक कोंडी नित्‍याचीच!

Zuari Bridge: पुलावर वाहतुकीची कोंडी नेहमीचीच आहे, अशी टीका खासदार सार्दिन यांनी केली आहे.
Zuari Bridge
Zuari Bridge Dainik Gomantak

Zuari Bridge: अलीकडे झुवारी पुलावर वाहतुकीची कोंडी नित्‍याचीच बनली आहे. त्‍यामुळे वाहनचालकांना नाहक मन:स्‍ताप सहन करावा लागतोय. हा प्रकार म्‍हणजे कायदा सुव्यवस्थेचा बोजवाराच आहे. या समस्‍येवर उपाययोजना करण्‍यास सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, अशी टीका खासदार फ्रान्‍सिस सार्दिन यांनी मडगाव येथे पत्रकार परिषदेत केली.

आगशी येथील नागरिकांनी याबाबत आपली भेट घेऊन वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसी पोलिस कुमक नसल्याचे आपल्याला सांगितले. वाहनांच्या पाच रांगा लागतात व शेवटी आगशी जंक्शन ते आगशी पोलिस स्थानकाकडे केवळ एकच वाहन जाऊ शकते अशी स्‍थिती आहे. आगशी पोलिस स्थानक तेथून जवळच आहे.

Zuari Bridge
Zuari Bridge: झुआरी पुलाची लोड टेस्टिंग पुर्ण; खुला करण्याबाबत वाहतूक मंत्री काब्राल म्हणाले..

एखादा अपघात घडलाच तर ताबडतोब पोलिस कुमक पाठवून रस्ता मोकळा करणे त्‍यांचे कर्तव्‍य आहे. पण तसे होत नाही. शनिवार आणि रविवार या दिवशी तर लोकांना दोन-दोन तास वाटेत तिष्‍ठत रहावे लागते. त्यामुळे अनेकांना विमान चुकण्‍याचेही प्रकार घडलेले आहेत, असे सांगून लोकांनीसुद्धा कायदा सुव्यवस्थेचे तसेच वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन सार्दिन यांनी केले.

दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रत्येक वाहतूक पोलिसाच्या हातात अल्कोमीटर असणे गरजेचे आहे. ही व्‍यवस्‍था पोलिस खात्याने त्‍वरित उपलब्‍ध करून द्यावी, जेणेकरून त्याचक्षणी चालकाची तपासणी करण्‍यात येईल, असे सार्दिन म्‍हणाले.

ज्येष्ठ नागरिकांना अजूनही महिन्याचे अनुदान मिळाले नसल्याबद्दल त्‍यांनी नाराजी व्‍यक्त केली. तसेच रेती व खनिज व्‍यवसाय सुरू करणे या सरकारी घोषणा केवळ कागदावरच राहिल्‍या आहेत, अशी टीकाही त्‍यांनी केली.

कदंब वाहतूक महामंडळावर टीका करताना सार्दिन यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक बसेसची देखरेख व्यवस्थित होणे आवश्यक आहे. काही बसेस रस्त्यावरच बंद पडतात. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रत्येक पेट्रोलपंपवर चार्जिंग मशीन असणे आता गरजेचे झाले आहे, असेही ते म्‍हणाले.

Zuari Bridge
Petrol-Diesel Price In Goa: खूशखबर! पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त, काय आहेत गोव्यातील आजचे इंधनाचे दर

उगेत आयआयटीला दिलेल्‍या समर्थनाबाबत शंका

सांगे येथील उगे पंचायतीच्या ग्रामसभेत आयआयटी प्रकल्‍पाचे जे समर्थन करण्‍यात आले, त्‍याबाबत काहीतरी गौडबंगाल असल्याचा संशय सार्दिन यांनी व्यक्त केला. या विषयावर चर्चा करण्यासाठी खास ग्रामसभा बोलवावी व ज्यांच्या जमिनी प्रकल्‍पासाठी जात आहेत त्यांनाही बैठकीत आमंत्रित करावे असे ते म्‍हणाले.

ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये गोमंतकीयांना आरक्षण नाही, त्या गोव्यात सुरू करून काय उपयोग, असा सवालाही त्यांनी उपस्थित केला. बीएसएनएल समितीचे चेअरमन असलेल्या सार्दिन यांनी सांगितले की पुढील तीन महिन्यांत बीएसएनएलचा कारभार सुरळीत व व्यवस्‍थित केला जाईल.

फ्रान्‍सिस सार्दिन, दक्षिण गोवा खासदार

आगशी येथे वाहतुकीची कोंडी एवढी होते की, वाहनांच्या पाच-पाच रांगा लागतात. तेथून आगशी पोलिस स्थानक जवळच आहे. एखादा अपघात घडलाच तर ताबडतोब पोलिस कुमक पाठवून रस्ता मोकळा करणे पोलिसांचे कर्तव्‍य आहे. पण तसे होत नाही. शनिवार आणि रविवार या दिवशी तर लोकांना दोन-दोन तास वाटेत तिष्‍ठत रहावे लागते. त्‍यामुळे अनेकांची विमानाची वेळ चुकल्‍याचे प्रकारही घडलेले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com