ZP Election: लेकीचे पहिले मतदान, वडिलांना 'विजयाचा' विश्वास! CM सावंतांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Pramod Sawant casts vote: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या पत्नी सुलक्षणा सावंत आणि कन्या पार्थिवी यांच्यासह कोठंबी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला
First vote Parthivi Sawant
First vote Parthivi SawantDainik Gomantak
Published on
Updated on

कोठंबी: गोव्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत एक महत्त्वाचा क्षण पाहायला मिळाला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या पत्नी सुलक्षणा सावंत आणि कन्या पार्थिवी सावंत यांच्यासह कोठंबी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांची कन्या पार्थिवी हिने पहिले मतदान (First Vote) केले, ज्यामुळे सावंत कुटुंबासाठी हा दिवस लोकशाहीच्या उत्सवासोबतच वैयक्तिक आनंदाचाही ठरला.

भाजप-मगोप युतीचा 'क्लीन स्वीप'चा निर्धार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केलाय. ते म्हणाले की, "जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप आणि मगोप (MGP) युती विरोधकांना 'क्लीन स्वीप' करेल. दोन्ही जिल्हा पंचायतींवर युतीची सत्ता येईल आणि या विजयामुळे राज्यात 'तिहेरी इंजिन' कार्यरत होईल." ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी गोवेकरांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ग्रामीण अर्थव्यवस्था आणि महिला सशक्तीकरणावर भर

मुख्यमंत्र्यांनी केवळ राजकीय विजयाचाच दावा केला नाही, तर ग्रामीण विकासाची नवी रूपरेषाही मांडली. ग्रामीण भागाची उन्नती करण्यासाठी सामूहिक शेती, दुग्धउत्पादन, फलोत्पादन आणि मच्छिमारी यांसारखे उपक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.

"ग्रामीण विकास खात्यासोबत स्वयंसाह्य गट आणि जिल्हा पंचायत जोडून आम्ही महिला सशक्तीकरणासाठी ठोस पावले उचलणार आहोत. महिलांची उन्नती आणि ग्रामीण भागातील कुशल-अकुशल कामगारांसाठी रोजगार निर्मिती हे आमचे मुख्य उद्दिष्ट असेल," असेही मुख्यमंत्री म्हणाले.

First vote Parthivi Sawant
Goa ZP Election 2025: फोंडा तालुक्यातील कौल कोणाच्या बाजूने? भाजपची प्रतिष्ठा पणाला; विधानसभेची रंगीत तालीम

लोकशाहीचा नवा वारसदार

मुख्यमंत्री सावंत यांची कन्या पार्थिवी हिने केलेले पहिले मतदान आजच्या निवडणुकीचे आकर्षण ठरले. "तरुणांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवणे ही काळाची गरज आहे," असे सांगत मुख्यमंत्र्यांनी आपली कन्या आणि राज्यातील सर्व तरुण मतदारांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील प्रश्न सोडवण्यासाठी आणि ग्रामविकासाला गती देण्यासाठी जिल्हा पंचायतींची भूमिका अत्यंत कळीची असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com