Jeromina Colaco: फुटबॉलपटू 'जेरोमिना' खेळातून राजकारणात! ‘राय’मधून उमेदवारी जाहीर; ‘आप’कडून लढवणार निवडणूक

Goa ZP Election: जाहीर झालेल्या याद्यांमध्ये महिलांना प्राधान्य देण्याची भूमिका दिसलीच होती; आता पाचव्या यादीतही विविध कौशल्य असलेल्या व्यक्तींना स्थान देण्यात आले आहे.
Jeromina Colaco
Jeromina ColacoDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: आगामी जिल्हा पंचायत निवडणुकांच्या तयारीचा भाग म्हणून आज आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. आधी जाहीर झालेल्या याद्यांमध्ये महिलांना प्राधान्य देण्याची भूमिका दिसलीच होती; आता पाचव्या यादीतही विविध कौशल्य असलेल्या व्यक्तींना स्थान देण्यात आले आहे.

यामध्ये गोव्याच्या नामांकित फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक जेरोमिना कुलासो यांना राय मतदारसंघातून अधिकृत उमेदवार घोषित केले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत ‘आप’ने तरुण, सुशिक्षित आणि प्रतिभावान महिलांना पुढे आणण्यावर भर दिला आहे.

Jeromina Colaco
Curti ZP Election: कुर्टीत तिरंगी लढत अटळ! ‘भाजप’पुढे ‘मगो’चे आव्हान, काँग्रेसचीही तयारी; आप, आरजीपीची भूमिका अस्पष्ट

जेरोमिना कुलासो यांचा जन्म बारेभाट-आर्लेम येथे झाला आणि तिथेच त्यांचे बालपण गेले. लहानपणापासूनच फुटबॉल त्यांच्या आयुष्याचा नैसर्गिक भाग होता. केवळ आवडीपुरता नाही, तर मुलांना एकत्र आणणारा आणि खेळभावना वाढवणारा खेळ म्हणून फुटबॉलने त्यांना आकर्षित केले. हळूहळू फुटबॉल त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला.

फुटबॉलशी असलेले त्यांचे नाते वाढत गेले आणि त्या प्रशिक्षक म्हणूनही काम करू लागल्या. त्यांनी अंडर फोर्टिन आणि सिनीयर गटात गोव्याचे प्रतिनिधित्व केले. सध्या त्या स्थानिक तरुण फुटबॉलपटूंना प्रशिक्षण देत आहेत. जेरोमिना यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. ज्यामुळे चांगली प्रशासन व्यवस्था आणि क्रीडा विकास साधता येईल.

Jeromina Colaco
Goa ZP Election: सासष्टीत भाजपकडून 3 च उमेदवार! 6 जागांवर अपक्षांना पाठिंबा; दक्षिण गोव्यात लढवणार 18 जागा

गोव्यातील खेळाडू चमकावेत!

छोट्या गावांमधील प्रतिभावान मुलांना चांगले प्रशिक्षण, सुविधा आणि राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळावी हे जेरोमिना यांचे स्वप्न आहे. आर्थिक परिस्थिती कशीही असो, प्रत्येक मुलाला फुटबॉलसह इतर क्रीडा क्षेत्रात चमकण्याची संधी मिळाली पाहिजे, असे त्यांचे ठाम मत आहे. गोव्यातील खेळाडूंनी राज्यापुरतेच नव्हे तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमकावे, अशी त्यांची इच्छा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com