Goa Politics: 'मतदारांचा भाजप-मगो युतीलाच पाठिंबा'! आमदार आरोलकरांचा विश्वास; धारगळमधून हरमलकर यांच्या विजयाची खात्री व्यक्त

Jeet Arolkar: हरमलकर यांनी सांगितले, की आपल्याला आमदार जीत आरोलकर, आमदार प्रवीण आर्लेकर, माजी आमदार दयानंद सोपटे यांचा पाठिंबा आहेच.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: पोरस्कडे, धारगळ, तुये, पार्से या परिसरात प्रचारावेळी मतदारांनी स्पष्टपणे सांगितले, की आम्ही केवळ भाजप-मगो युतीलाच मतदान करणार आणि त्याच बळावर धारगळमधून भाजप-मगो युतीचे उमेदवार श्रीकृष्ण हरमलकर विजयी होतील, असा विश्वास मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी व्यक्त केला.

हरमलकर यांनी सांगितले, की आपल्याला आमदार जीत आरोलकर, आमदार प्रवीण आर्लेकर, माजी आमदार दयानंद सोपटे यांचा पाठिंबा आहेच. शिवाय धारगळ, पोरस्कडे, तुये, विर्नोडा पार्से या पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य प्रत्येक गावातील जास्तीत जास्त मतदारांचा पाठिंबा असल्यामुळे आपला विजय निश्चित आहे. आपल्याला एक संधी देऊन विकास कशा पद्धतीने करणार हे जनतेने पहावे, असेही ते म्हणाले.

Goa Politics
Goa Liberation Day: नेहरूंनी दिलेला 'तो' एक आदेश अन् गोवा झाला मुक्त; वाचा 36 तासांच्या धडाकेबाज मोहिमेचा थरार

यावेळी पार्सेचे सरपंच अजय कलंगुटकर पंच अजित मोरजकर, उषा नागवेकर, लक्ष्मीकांत गवंडी, रुद्रेश नागवेकर, दयानंद मांजरेकर, पोरस्कडे सरपंच सिद्धी गडेकर, माजी सरपंच निशा हळदणकर, तुये माजी सरपंच सुहास नाईक, जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर आदी समर्थक उपस्थित होते.

Goa Politics
Goa Liberation Day 2025: गोवा मुक्तीचा 'तो' ऐतिहासिक लढा...! संयुक्त राष्ट्रात भारतासाठी रशियाने घेतला संपूर्ण जगाशी पंगा; फेल झाली अमेरिका-ब्रिटनची चाल

सरपंच अजय कलंगुटकर म्हणाले, युतीच्या उमेदवाराचे चिन्ह आणि जाहीरनामा आम्ही घरोघरी पोहोचवून त्यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर यांनी आपण जिल्हा पंचायत सदस्य असताना ४.१५ कोटींचा निधी वापरून या मतदार संघाचा विकास केलेला आहे. आता उर्वरित विकास कामांसाठी हरमलकर यांना जनता शंभर टक्के संधी देईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com