Goa Assembly: आलेमाव यांच्या 230 दुरुस्त्यांवर विधानसभेत चर्चा; दुरुस्त्यांमध्ये अनेक समस्यांचा समावेश

Yuri Alemao: विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मांडलेल्या 24 अभिनंदन प्रस्तावांमध्ये विधवा उषा नाईक यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावाचा समावेश आहे.
Yuri Alemao
Yuri AlemaoDainik Gomantak
Published on
Updated on

Yuri Alemao: विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावात 230 दुरुस्त्या मांडल्या आहेत ज्यावर सोमवार 5 फेब्रुवारी 2024 आणि बुधवार 7 फेब्रुवारी 2024 रोजी विधानसभेत चर्चा होणार आहे.

230 दुरुस्त्यांमध्ये वित्तीय व्यवस्थापनातील सरकारचे अपयश, कायदा आणि सुव्यवस्था ढासळणे, वाढती बेरोजगारी, पेटीएमकडे सामंजस्य करार, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या प्राधिकरणांच्या माहितीशिवाय मृतदेहांची सीमेपलीकडे वाहतूक, म्हादई विवाद, पर्यावरणीय समस्या, प्रदूषण, भ्रष्टाचार यासारख्या गोव्याशी संबंधित विविध समस्यांचा समावेश आहे.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अपयश, खाणकाम पुन्हा सुरू न होणे, संजीवनी साखर कारखाना, भोमा आणि कुंकळ्ळी येथील बायपासचा प्रश्न, घातक कचऱ्याची विल्हेवाट, कार्यक्रमांवर होणारा फालतू खर्च, स्मार्ट सिटी असे आणखी काही मुद्दे विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या दुरुस्ती प्रस्तावात ठळकपणे मांडले आहेत.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मांडलेल्या 24 अभिनंदन प्रस्तावांमध्ये विधवा उषा नाईक यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावाचा समावेश आहे आपली मुलगी डॉ. गौतमी हिच्या लग्नाचे सर्व विधी पार पाडले होते.

Yuri Alemao
मंत्री गोविंद गावडे पुन्हा अडचणीत, सभापतींनी केले भ्रष्टाचाराचे आरोप; विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी

गोव्यातील एका महिलेने उचललेले ते एक अग्रगण्य पाऊल आहे असे युरी आलेमाव यांनी प्रस्तावात म्हटले आहे. इतर अभिनंदन प्रस्तावांमध्ये गोव्यातील राष्ट्रीय खेळांमधील पदक विजेते, विविध खेळाडू, कलाकार, लेखक आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशवंत यांचा समावेश आहे.

युरी आलेमाव यांनी मांडलेल्या शोक प्रस्तावात सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण नाईक, गायक जॉन्सन फर्नांडिस, नाट्यकर्मी विजयकुमार नाईक आणि पुजारी प्रकाश भट यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com