Sahitya Akademi Award: माझ्या मातीतील शब्द दूरवर पोचविण्यासाठी लिहिणार : तन्वी बांबोळकर

डॉ. तन्वी कामत बांबोळकर यांच्या ‘शॉट’ लघुकथा संग्रहाला युवा पुरस्कार मिळाला
Tanvi Bambolkar
Tanvi BambolkarDainik Gomantak
Published on
Updated on

साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कारप्राप्त झाल्यामुळे मला अत्यानंद झाला असून या क्षणी माझ्या भावना काय आहेत? त्याचे वर्णन करण्यासाठी माझ्यापाशी शब्द नाहीत. या पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी आणखी वाढली आहे. ही केवळ सुरुवात आहे. माझ्या मातीतील शब्द दूरवर पोहोचेपर्यंत मी लिहीत राहणार आहे, अशा शब्दांत यंदाचा युवा साहित्य पुरस्कार प्राप्त झालेल्या डॉ. तन्वी कामत बांबोळकर यांनी सांगितले.

तिच्या ‘शॉट्स’ या लघुकथा पुस्तकाची यंदा साहित्य अकादमीने युवा साहित्य पुरस्कारासाठी निवड केली. डॉ. तन्वी कामत बांबोळकर या केपे येथील सरकारी महाविद्यालयात इंग्रजीच्या प्राध्यापक आहेत.

Tanvi Bambolkar
Panaji police station attack : बाबूश, जेनिफर यांचे पाय आणखी खोलात

शणै गोंयबाब यांच्या जयंतीदिनी हा पुरस्कार जाहीर झाल्याने पुरस्काराला महत्त्व आहे. कोकणीमध्ये लिहिणे हा माझ्या छंदाचा एक भाग, पण त्याचबरोबर आम्ही ज्या भाषेत बोलतो, त्या भाषेसाठीची बांधिलकी, वचनबद्धता आहे. हा पुरस्कार म्हणजे माझ्या भाषेसाठी आणि राज्यासाठी आणखी मेहनत करण्यासाठी मिळालेले प्रोत्साहन आहे, असे बांबोळकर म्हणाल्या.

माझ्या या लेखनाच्या प्रवासात मला माझ्या कुटुंबीयांचे, मित्रमैत्रिणींचे, सहकाऱ्यांचे व संपूर्ण कोकणी कुटुंबाकडून मिळालेले सहकार्य व प्रोत्साहनाबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते.

Tanvi Bambolkar
Bicholim News : डिचोलीत चोरट्या पद्धतीने रेतीची वाहतूक; दोन ट्रक जप्त, चालकाला अटक

एकाच वेळी चार पुस्तके प्रकाशित

डॉ. तन्वी कामत बांबोळकर यांची चार पुस्तके एकाचवेळी प्रकाशित झाली होती. यात पुरस्कारप्राप्त शॉट्सबरोबर पांवळी (कविता संग्रह), अनवाणी व लॉग आवट (नाटके) यांचा समावेश आहे. लॉग आवट या नाटकाला कला अकादमीच्या नाट्य स्पर्धेत लेखनाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. तसेच ‘हिडिंबा’ या नाटकाचे अजून प्रकाशन झालेले नाही, तरी कला अकादमीच्या नाट्य स्पर्धेत लेखनाचा दुसरा पुरस्कार प्राप्त झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com