नवीन शैक्षणिक धोरणावर 'वेळगे'त कार्यशाळा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सहभाग: परिसंवाद आणि चर्चासत्राद्वारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन
अंगणवाडी
अंगणवाडीDainik Gomantak

साखळी: वेळगे येथील भारती बांदोडकर प्राथमिक विद्यालयात वेळगे महाशाळा समूह आणि बाल शिक्षण परिषद गोवा यांच्यातर्फे ‘नवीन शैक्षणिक धोरण’ विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ‘नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक, पालक व संस्थांची भूमिका’ या विषयावर परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन केले होते.

डिचोली सीडीपीओ क्षेत्रातील अंगणवाडी शिक्षिका व अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी ही कार्यशाळा आयोजिली होती. कार्यशाळेत नवीन शैक्षणिक धोरण तयारीच्या टप्प्यात पालक, शिक्षकांची भूमिका व नवीन शैक्षणिक धोरणाशी संबंधित विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

अंगणवाडी
Goa Culture: 'पारंपरिक कलांचे जतन करा'

व्यासपीठावर डॉ. नारायण देसाई, कालिदास मराठे, कमलाकर म्हाळशी, झिलू गावकर, तुळशीदास सामंत, नाट्य दिग्दर्शक अभय जोग, तरळे, श्रीमती विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका चित्रा परांजपे, सिद्धार्थ बांदोडकर उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अनिल वेर्णेकर उपस्थित होते.

अंगणवाडी
मोपा विमानतळावरुन पहिलं उड्डाण 15 ऑगस्टला; लिंक रोड मात्र अपूर्णच

पहिल्या सत्रात डॉ. नारायण देसाई यांनी नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल माहिती दिली. दुसऱ्या सत्रात कालिदास मराठे यांनी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात कमलाकर म्हाळशी यांनी शैक्षणिक धोरणात पालकांची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे स्पष्ट केले. तुळशीदास सामंत यांनी गणित विषयाशी निगडित बाबी सांगितल्या.

कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण गावस, मंदार जोग, योगेश कवठणकर, दिप्तेश सावंत, भारती हळदणकर, रेश्मा पेडणेकर, आरती नागेशकर, मयुरी नाईक, बिंदिया नाईक, श्रुतिका पाटील, स्नेहा ताटे, मोहिनी वेंगुर्लेकर, अंबिका पाटील, वंदना नायक, वंदना च्यारी, विमल गावस आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. झिलू गावकर यांनी प्रास्ताविक केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com