Goa Culture: 'पारंपरिक कलांचे जतन करा'

राजमोहन शेट्ये: मोपात महिला भजन महोत्सवाची उत्साहात सांगता
राजमोहन शेटये
राजमोहन शेटयेDainik Gomantak

पेडणे: कला व संस्कृती आपल्या भावी पिढीला कळायला हवी, आपला देश केवळ संस्कृतीवर अवलंबून आहे. यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील कलांना चांगले व्यासपीठ मिळण्यासाठी नवनवीन कार्यक्रमांचे आयोजन व्हायला हवे, त्यात लहान मुले, युवक यांना सहभागी करुन घेतले, तरच या सर्व कला समाजा समोर चांगल्या स्वरूपात येतील, आपल्या पूर्वजांनी ज्या मेहनतीने या कलांचे संवर्धन केले, त्या कलांचा ठेवा जतन करण्याची प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष राजमोहन शेटये यांनी व्यक्त केले.

राजमोहन शेटये
मडगावला मिळाले 'वसुली' वाहन

मोपा गावातील गिरोबा सेल्प हेल्प समूह गावठणवाडा-मोपा, कला व संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाश विठ्ठल नाईक गावकर स्मृती महिला भजन महोत्सवाचे उद्‍घाटन त्यांच्या हस्ते झाल्यानंतर ते बोलत होते.

व्यासपीठावर साहाय्यक संचालक मिलिंद माटे. संगीतकार नाना आसोलकर, जि. प. सदस्य सीमा खडपे, पंच पल्लवी राउळ, दिपश्री माळकर, जयप्रकाश परब, अशोक परब, शाम सुंदर नाईक, क्रांती मोपकर, विजया परब, उमेश गाड उपस्थित होते.

राजमोहन शेटये
फोंड्यात दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत वर्ग

माटे म्हणाले, फुगडी ही हजारो वर्षांची कला आहे. आपल्या पारंपरिक कलांचे महिलांनी जतन केले आहे. पुरातन व वेद काळात काळातील साहित्यात महिलांना मोठे स्थान असल्याचे जाणवते. आपला इतिहास आपण अभ्यासून भावी पिढीसमोर ठेवला पाहिजे. या कार्यक्रमाला नाना आसोलकर, दिपश्री माळकर, अशोक परब यांचीही भाषणे झाली. सिद्धी शेलार यांनी सूत्रसंचालन केले सत्यवान नाईक यांनी स्वागत केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com