Brijbhushan Sharan Singh: आंदोलक कुस्तीपटूंवरील हल्ल्याचा गोवा महिला संघटनांकडून निषेध

खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी
Goa Women
Goa Women Gomantak Digital Team
Published on
Updated on

Brijbhushan Sharan Singh Wrestlers Protest: गेल्या एक महिन्यापासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात एका अल्पवयीन कुस्तीपटूसह सात जणांनी लैंगिक छळाच्या तक्रारी दाखल करूनही सरकारकडून कारवाई केली जात नसल्याबद्दल राज्यातील महिला संघटनांनी निषेध केला.

न्यायासाठी आंदोलन करत असताना पोलिसानी अटक केलेल्या कुस्तीपटूंना तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्यांची सुटका करण्याची तसेच खासदारांना अटक करण्याची मागणी केली आहे.

पणजीतील आझाद मैदानावर आज संध्याकाळी महिला संघटनांनाच्या बायलांचो साद, बायलांचो एकवट, अखिल गोवा मुस्लिम महिला संघटनानी एकत्रित येऊन पोलिसांनी कुस्तीपटूंना हुसकावून लावण्यासाठी केलेली जबरदस्ती तसेच अटक ही निंदनीय आहे.

ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंना मारहाण करण्याबरोबरच त्यांना ओढून नेण्याची पोलिसांची ही कृती अशोभनीय आहे.

Goa Women
Arjun Kapoor Nude Photo Shoot : अर्जुन कपूरचे न्यूड फोटो शूट...मलाईका म्हणते माझं आळशी बाळ...

ज्याच्याविरुद्ध लैंगिक छळाचा आरोप आहेत, त्याला हे सरकार संरक्षण देत आहे. त्याचा निषेध करण्यात येत आहे. कुस्तीपटूंची ही न्यायासाठीची लढाई महिलांचे होणारे लैंगिक शोषणाविरुद्ध आहे. महिला खेळाडूंना स्वच्छ वातावरणात खेळामध्ये सराव करण्यास मिळावा व संरक्षण मिळावे यासाठी ही लढाई आहे.

Goa Women
Goa Statehood Day: 36 वा गोवा घटकराज्य दिन; राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांनी गोमन्तकीयांना दिल्या शुभेच्छा

संशयितांना मोकळे सोडून आंदोलकांना धमकावण्याचे तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याचे केंद्र सरकारची कृती संताप आणणारी आहे.

या कुस्तीपटूंना गोव्यातील महिला संघटनांचा पूर्ण पाठिंबा असून केंद्र सरकारने चालविलेल्या अत्याचारा निषेध करण्यात येत आहे, असे या संघटनांच्या नेत्यांनी मत व्यक्त केले.

Goa Women
Foods to Avoid in Morning: सकाळी रिकाम्या पोटी 'हे' पदार्थ खाल्यास बिघडू शकते तब्येत

लैंगिक छळाचा आरोप असलेल्या खासदार ब्रिजभूषण यांना त्वरित अटक करण्यात यावी. विनाकारण अटक केलेल्या कुस्तीपटूंना व त्यांच्या पाठिराख्यांची सुटका केली जावी, तसेच आंदोलनकर्त्यांना त्यांचा हक्क बजावण्यास देण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com