Goa: आमठाणे धरणात गुरांचा संचार, मगरींमुळे धोका, पर्यटकांकडूनही अतिउत्साह

मगरींचे वास्तव्य असलेल्या आमठाणे धरणावर (Amthane Dam) काही पर्यटक अतिउत्साह दाखवत असल्याचे आढळून येत असतानाच, सध्या मोकाट गुरांचाही धरणात संचार वाढला आहे.
Amthane Dam
Amthane DamDainik Gomantak

डिचोली: मगरींचे वास्तव्य असलेल्या आमठाणे धरणावर (Amthane Dam) काही पर्यटक अतिउत्साह दाखवत असल्याचे आढळून येत असतानाच, सध्या मोकाट गुरांचाही धरणात संचार वाढला आहे. धरण परिसरात संचार करणारी ही गुरे बऱ्याचदा धरणातील पाण्यात उतरत असल्याचे आढळून येत आहे. या धरणात मगरींचे वास्तव्य असल्याने या मगरी एखादेवेळी धरणात उतरणाऱ्या मुक्या गुरांचा काळ ठरण्याची भिती नाकारता येत नाही. दरम्यान, आठ दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसानंतर हे धरण तुडुंब भरले आहे. त्यामुळे सध्या या धरणावर पावसाळी पर्यटनाची चाहूल जाणवू लागली आहे.

मागील काही वर्षांपासून डिचोली (Bicholim) तालुक्यातील आमठाणे धरणाकडे एक पर्यटन स्थळ म्हणून पाहण्यात येत आहे. अधूनमधून या धरणाला स्थानिक तसेच राज्याबाहेरील पर्यटक भेट देतात.मागील जानेवारी महिन्यात नववर्षाची मजा लुटण्यासाठी या धरणात उतरलेल्या राजस्थानमधील एका युवा पर्यटकावर (Tourist) मगरीने हल्ला केला होता. या हल्ल्यात 'त्या' पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर जलस्रोत खात्याने धरणात मगरी असून, पाण्यात उतरण्याचा धोका पत्करू नये.

Amthane Dam
Goa: मांद्रेतील उमावती गडेकर यांच्या घराविषयी 'जैसे थे' चा आदेश

अशी सूचना देणारे फलकही धरणाच्या काठी उभारलेले आहेत. यावरून या धरणात मगरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. धरणात मगरी असल्याचे स्पष्ट असतानाही, त्याकडे दुर्लक्ष करून धरणाला भेट देणारे काहीजण अतिउत्साह दाखवून धरणाच्या पाण्यात उतरत असतात. अशी माहिती मिळाली आहे. त्यात आता मुकी गुरेही धरणात संचार करीत आहेत. त्यामुळे या गुरांनाही मगरींपासून धोका आहे.

रस्त्याची हालत

धरणावरील रस्त्याचीही सध्या वाताहात झाली आहे. अवजड वाहनां साठी हा रस्ता बंद असला, तरी मोटारगाड्या आणि दुचाकी मिळून दरदिवशी शेकडो वाहनांची या रस्त्यावरुन ये-जा चालूच असते. हा रस्ता उखडलेला असून, विविध ठिकाणी लहानमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याच्या एकाबाजूने धरण तर दुसऱ्याबाजूने खोल दरी आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने संरक्षण नसल्याने खराब रस्त्यामुळे एखादेवेळी अनर्थ घडण्याची संभावना नाकारता येत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com