Goa
Goa Dainik Gomantak

Goa Egg Price: कसा करायचा ख्रिसमस साजरा? महागाईचा भडका; अंडी - नारळाचे वाढले भाव; जाणून घ्या ताजा दर..

Goa Coconut Price: राज्यात नाताळ सणांची जय्यत तयारी सुरू आहे. या सणासुदीसाठी लागणारे केक, मिठाई करण्याची तयारी देखील सुरू झाली आहे.
Published on

पणजी: राज्यात नाताळ सणांची जय्यत तयारी सुरू आहे. या सणासुदीसाठी लागणारे केक, मिठाई करण्याची तयारी देखील सुरू झाली आहे, अशातच राज्यात अंड्यांची किंमत वाढली असून ८० रुपये डझन असलेली अंडी आता तब्बल शंभर रुपये डझन दराने विकली जात आहेत.

ऐन नाताळात अंडीही भाव खाऊ लागली आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात अंडी शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून आयात करून येथे विकली जातात. राज्यात अतिशय नगण्य स्वरूपात अंड्यांचे उत्पादन घेतले जाते, तसेच थंडीच्या कालावधीत अंडी कमी प्रमाणात मिळत असतात.

मागणी अधिक आणि अंड्याची कमरता यामुळे अंड्याचे दर वाढत असल्याचे विक्रेते सांगतात. सध्या नाताळसाठी केक तयार करणे, बेबिंका व इतर पदार्थ बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात अंड्यांची मागणी वाढली आहे. येत्या काळात नाताळ आणि वर्ष अखेरीस पर्यटनाच्या अनुषंगाने देखील अंड्यांना मागणी वाढणार आहे, त्यामुळे महिनाभर अंड्यांचे दर चढेच राहण्याची शक्यता अधिक आहे.

Goa
Egg Rate: थंडीत तापली अंडी; दरात 10 रुपयांनी वाढ, 90 रुपये डझन; महाराष्ट्र, कर्नाटकमधून अंड्यांचा पुरवठा मंदावल्याने तुटवडा

नारळांचा तुटवडा

राज्यात मागील सहा महिन्यांपासून नारळांचा तुटवडा कायम आहे. नारळाचे दरही भरमसाट वाढले आहेत. ज्याप्रमाणे नाताळनिमित्त लागणाऱ्या मिठाईत अंडी लागतात तसेच नारळ देखील मोठ्या प्रमाणात लागतात. सध्या वर्ष अखेरीस मोठ्या प्रमाणात पर्यटकही वाढणार आहेत, अशावेळी राज्यातील नारळाचा तुटवडा भरून काढण्यासाठी व्यापारी कारवार आणि सिंधुदुर्गावर अवलंबून आहेत.

Goa
Goa Coconut Price: गोवेकरांवर 'नारळ' का रुसलाय? बाजारात तुटवडा कायम; दर अजून भडकलेलेच

सध्या बाजारात छोटे नारळ ३० ते ४० रूपये, मध्यम आकाराचे ५० ते ६० आणि मोठ्या आकाराचे नारळ ७० रुपये प्रती नग दराने विकले जात असून वाढत्या महागाईने सर्वसामान्य गोमंतकीय हैराण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com