Vishwajit Rane On Congress: काँग्रेसने काय दिवे लावले? विश्वजीत राणेंचा घणाघात

Vishwajit Rane On Congress: सध्‍या काँग्रेसचा भर टीकेवर आहे, त्यातून एक दिवसाचे मनोरंजन होते. आमचा भर रचनात्मक कामांवर आहे.
Vishwajit Rane On Congress
Vishwajit Rane On CongressDainik Gomantak

Vishwajit Rane On Congress

काँग्रेसने आपल्या काळात काय केले ते सांगून मते मागावीत. आम्ही आमच्या दहा वर्षांच्या काळात काय केले आहे ते सांगून मते मागत आहोत. जनता सुज्ञ आहे. ती भाजपलाच मतदान करेल, असा विश्‍‍वास आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी आज व्‍यक्त केला.

गृहआधार, दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना कोणी सुरू केली? साडेचार लाखांची कर्करोग प्रतिबंधक लस मोफत देणे कोणी सुरू केली? हृदयात बसवायचा सात लाखांच्‍या पेसमेकर मोफत देणे कोणी सुरू केले? जनतेने याचा विचार जरूर करेल, असे राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सरचिटणीस दामू नाईक, आमदार केदार नाईक यांचीही उपस्‍थिती होती.

उत्तर गोव्‍यात श्रीपाद नाईक आणि दक्षिणेत पल्लवी धेंपे या विजयी होतील यात शंकाच नाही.

सध्‍या काँग्रेसचा भर टीकेवर आहे, त्यातून एक दिवसाचे मनोरंजन होते. आमचा भर रचनात्मक कामांवर आहे. तसेच आमचे नेतृत्व विश्‍‍वगुरु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ध्यास गोव्याच्या विकास हा आहे. रोजगारनिर्मितीसाठी गोवा हे सर्वांच्या पसंतीचे ठिकाण व्हावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे, असे विश्‍‍वजीत राणे म्‍हणाले.

‘आयुष्यमान भारत’ व ‘डीडीएसएसवाय या आरोग्य विमा योजना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे नेत आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कर्करोग इस्पितळाचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या केमोथेरपीसह कर्करोगाचे उपचार गोव्‍यात मोफत केले जात आहेत. टाटा मेमोरिअलमध्ये गोमेकॉच्या ५० परिचारिका प्रशिक्षण घेत आहेत. कर्करोग इस्पितळ झाल्यावर त्या गोमेकॉत रुजू होतील. रोबोटिक्स सर्जरीपर्यंत गोमेकॉने प्रगती केली आहे, असेही राणे यांनी सांगितले.

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाला खासगी वैद्यकीय महाविद्यालय जोडले जाणार आहे. त्यामुळे गोमंतकीय विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी तर मिळेलच, शिवाय अतिदक्षता विभाग, सुसज्ज शस्त्रक्रिया कक्षांसह आधुनिक सुविधा तेथे निर्माण होतील. त्‍यामुळे दक्षिण गोव्यातील जनतेला गोमेकॉत हेलपाटे मारावे लागणार नाहीत.

मुख्यमंत्र्यांनी ‘एम्स’ मिळविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याच कार्यकाळात या साऱ्या सुविधा आम्ही जनतेसाठी देऊ, असे आरोग्‍यमंत्र्यांनी सांगितले. कल्याणकारी योजना असोत किंवा मोफत उपचार, हे सारे काँग्रेसचे सरकार करू शकले नव्हते. त्यांनी असा विचार देखील केला नव्हता. त्यामुळे त्‍यांना आता टीका करण्‍याचा अधिकारच नाही. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसचे नेते मोठ्या संख्‍येने भाजपमध्ये येत आहेत. कारण काँग्रेसची अवस्था केविलवाणी झालेली आहे. त्यांच्याकडे नेतृत्वच नाही तर आमच्याकडे जगमान्य असे मोदींचे नेतृत्व आहे. असे विश्‍‍वजीत राणे यांनी सांगितले.

भाजप, संघाची विचारधारा स्‍वीकारलीय

मी भाजपमध्ये आलो तेव्हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शब्द दिला आहे. त्याचवेळी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा स्वीकारली आहे. होय, मी आता संघाचे आणि भाजपचे काम करतो. कोणताही पक्ष स्वीकारताना त्याची विचारधारा आधी स्वीकारावी लागते. ते मी केले आहे. भाजप सर्वांना समान न्याय देणारा पक्ष आहे. जनतेला लाभ देताना तो कोणताही भेदभाव करत नाही, असे विश्‍‍वजीत राणे म्‍हणाले.

Vishwajit Rane On Congress
Goa Farmer : गोमूत्र फवारणीमुळे काजू उत्पादनात वाढ; मिलिंद गाडगीळ यांचा प्रयोग यशस्वी

प्रतापसिंह राणे यांच्‍यानंतर स्व. मनोहर पर्रीकर व आता डॉ. प्रमोद सावंत यांनी आपापल्या पातळीवर राज्याचा विकास केला आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर असो वा अन्य विषय, एकदा ते पक्षाने स्वीकारले की ते मला पटलेले असतात. माझ्या वडिलांच्या वाढदिवसाला पंतप्रधान संदेश पाठवतात, तो मी नंतर ट्विट करतो. पंतप्रधानांच्या नावे असा संदेश उगाच ट्विट करता येत नाही हे लक्षात घ्या, असेही राणे यांनी सांगितले.

प्रतापसिंह राणेंचा श्रीपादना पाठिंबा

काँग्रेसला त्याचे श्रेयही घेता येणार नाही, असेही राणे म्‍हणाले. प्रतापसिंह राणे यांचे व्यक्तिमत्त्‍व सर्वमान्य आहे. त्यामुळेच आजही अनेक नेत्यांशी व जनतेशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांच्या वाढदिवसाला राज्‍याच्‍या कानाकोपऱ्यांतून लोक येतात. त्यांनीच मला नाईक यांना लोकसभेसाठी माझी पसंती असे सांगितले आहे. त्‍यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांचा प्रभाव जाणवला तर तो भाजप उमेदवाराच्या बाजूनेच जाणवेल आणि नाईक यांना सत्तरीतून मोठे मताधिक्य मिळेल, असे राणे म्‍हणाले.

सांकवाळ येथील जाहीर सभेच्‍या मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझी पाठ थोपटली. यामुळे काम करण्यास आणखी स्फूर्ती मिळाली आहे. मोदी हे आमचे नेतृत्व आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर काम चालते. आम्ही केलेल्या कामांची त्‍यांनी दखल घेतली, पोचपावती दिली तर त्याची खुशीच आहे.

- विश्‍‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

मोदींना दिलाय शब्‍द

मी भाजपमध्ये आलो तेव्हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शब्द दिला आहे. त्याचवेळी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा स्वीकारली आहे. होय, मी आता संघाचे आणि भाजपचे काम करतो. कोणताही पक्ष स्वीकारताना त्याची विचारधारा आधी स्वीकारावी लागते. ते मी केले आहे, असे राणे म्‍हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com