Goa Farmer : गोमूत्र फवारणीमुळे काजू उत्पादनात वाढ; मिलिंद गाडगीळ यांचा प्रयोग यशस्वी

Goa Farmer : आपण एक लिटर गोमूत्रात दहा लिटर पाणी मिसळून काजूला मोहोर आल्यावर फवारणी केली असता त्याचा परिणाम काजू उत्पादन वाढीवर झाल्याचे ते सांगतात.
 Cashew
Cashew Dainik Gomantak

Goa Farmer :

पणजी, राज्यातील शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या पीकापैकी एक पीक म्हणजे काजू. या पीकांवर राज्यातील अनेक शेतकऱ्यांची उपजीविका अवलंबून असते परंतु यंदा शेतकऱ्याला या पिकाने दगा दिला.

त्यांच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचे दिसून आले. परंतु नगरगाव-वाळपई येथील काजू उत्पादक मिलिंद गाडगीळ यांनी केलेला प्रयोग मोठा दिलासा देणारा आहे. आपण एक लिटर गोमूत्रात दहा लिटर पाणी मिसळून काजूला मोहोर आल्यावर फवारणी केली असता त्याचा परिणाम काजू उत्पादन वाढीवर झाल्याचे ते सांगतात.

संशोधन होण्याची गरज :

पूर्वी शेतकरी म्हणायचे की एखादा अवकाळी पाऊस लागला तर काजूचे पीक चांगले येईल. गोमूत्र आणि पाणी शिंपडून एकप्रकारे आपण कृत्रिम पाऊस त्या झाडांभोवती निर्माण करतो त्यांना पाणी मिळते आणि पीक चांगले येते.

गोमूत्र व पाणी शिंपडल्याने मला फायदा झालाय. परंतु याबाबत अधिक संशोधन होण्याची गरज आहे, असे गाडगीळ यांनी सांगितले.

 Cashew
PM Modi In Goa: पीएम मोदी 150 कोटी घेऊन येणार? सभेपूर्वी पंतप्रधानावर गोवा काँग्रेसकडून प्रश्नांचा भडीमार

किमान २०० रुपये हमीभाव द्यावा

सरकारचा काजूसाठी १५० रूपये हमीभाव आहे. परंतु सद्यस्थितीत ११४ रूपये प्रति किलो दराने काजू बियांची खरेदी केली जात आहे. हा दर शेतकऱ्याला परवडणारा नाही. राज्यसरकारने किमान २०० ते २५० हमीभाव द्यावा.

आधीच यंदा शेतकऱ्यांना योग्य उत्पन्न मिळालेले नाही त्यात कवडीमोलाने खरेदी होत आहे त्यामुळे दरात वाढ करावा अशी काजू उत्पादक शेतकऱ्यांची भावना असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com