Goa Weather : राज्यात पहाटेच्या गुलाबी थंडीला सुरुवात

Goa Weather : हवामान बदलांमुळे उशिरा आगमन ; कमाल तापमान २० अंश सेल्सिअसवर
Goa Weather
Goa WeatherDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी : दिवाळीच्या निमित्ताने राज्यात पहाटे गुलाबी थंडीचे आगमन झाले आहे. नुकताच झालेला मुसळधार पाऊस आणि तापमान वाढीचा अनुभव घेणारे नागरिक गुलाबी थंडीचा आनंद लुटताना दिसत आहेत. पुढील काही दिवस राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता गोवा वेधशाळेने व्यक्त केली असली तरी कमाल तापमानात देखील घट झाल्याने काही प्रमाणात थंडीची हुडहुडी जाणवत आहे.

सध्या राज्यातील किमान तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. घाटलगतच्या भागात सत्तरी, धारबांदोडा, मोले आणि राज्यातील बहुतांश भागात थंडीची चाहूल जाणवत आहे. तर शहरी भागात तसेच किनारी भागात देखील अल्प प्रमाणात थंडी पडत आहे. बदलत्या वातावरणामुळे अनेकांनी उबदार कपड्यांचा वापर सुरू केला आहे. मॉन्सुनोत्तर लांबलेला पाऊस आणि यंदा सततच्या होणाऱ्या हवामान बदलांमुळे थंडीचे आगमन काही दिवस उशिराच झाले. गत वर्षी १४ ऑक्टोबरला राज्यातून पाऊस परतला होता. यंदा तो २५ ऑक्टोबरपर्यंत लांबला. नोव्हेबरमध्ये थंडी अधिक वाढेल, असा अंदाज गोवा वेधशाळेने व्यक्त केला आहे. आज पणजी येथे कमाल ३२.७ अंश सेल्सिअस तर किमान २०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

संसर्गजन्य आजारांत वाढ

वातावरणातील बदल, धुके व इतर कारणांमुळे सर्दी, खोकला, पडसे, ताप आदी संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी गरम पाणी पिणे, बाहेरील अन्न तसेच तेलकट पदार्थ टाळावे. थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे वापरण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत.

काही दिवसांत थंडी अधिक वाढण्याची शक्यता आहे. घाटलगतच्या भागात सद्यस्थितीत अधिक प्रमाणात थंडी जाणवत आहे. थंडीचा अनुभव मोठ्या प्रमाणात नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात घेता येईल. त्यावेळी पणजीसहित किनारी भागातील किमान तापमान २० अंशापर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे.

- एम. राहुल, वैज्ञानिक, गोवा वेधशाळा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com