Weather Update: ऐन हिवाळ्यात उन्हाचा तडाखा; तापमानाचा पारा 36 अंशांवर, म्हापशात 38.8 अंशांची नोंद; उष्म्याने लोक हैराण

Goa temperature reaches 36 degrees: राज्यात मान्सूनने माघार घेतल्यानंतर आणि मान्सूनोत्तर कालावधी संपल्यानंतर आता खऱ्या अर्थाने हिवाळ्याला सुरुवात झाली आहे.
Weather Update
Weather UpdateDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राज्यात मान्सूनने माघार घेतल्यानंतर आणि मान्सूनोत्तर कालावधी संपल्यानंतर आता खऱ्या अर्थाने हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. मात्र, ऐन हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीऐवजी नागरिकांना असह्य उष्म्याला सामोरे जावे लागत आहे.

मागील दोन-तीन दिवसांपासून राज्यातील तापमानाचा पारा वाढला असून, मडगाव आणि दक्षिण गोव्यात दुपारच्या वेळी कमाल तापमान ३६ अंशांवर जात आहे. गोवा वेधशाळेच्या आकडेवारीनुसार, आज राज्यात कमाल तापमान ३६.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सामान्य तापमानाच्या तुलनेत त्यात २.५ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

Weather Update
Britain To Goa Flights: ब्रिटनमधून गोव्यात विमानफेऱ्यांत वाढ, 'टीयूआय'च्या पाच थेट फेऱ्या; 32,000 विमान आसने उपलब्ध

पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग मंदावणे, त्यासोबतच यंदा झालेला कमी पाऊस आणि थंडीचे उशिरा झालेले आगमन या कारणांमुळे राज्यातील तापमानाचा पारा वारंवार वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन गोवा वेधशाळेने केले आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून प्रामुख्याने दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान तापमानाचा पारा अधिक वाढत आहे.

सौम्य थंडीलाही सुरुवात

राज्यात उष्म्याचा जोर कायम असला, तरी कालपासून सौम्य थंडीलाही सुरुवात झाली आहे. उत्तर गोव्यात कोरडे वारे वाहू लागले असून, पहाटे धुके आणि दवही पडत आहे. किमान तापमान २३ अंशांपर्यंत जात असून, सामान्य किमान तापमानाच्या तुलनेत त्यात १.३ अंश सेल्सिअसने घट झाली आहे.

पुढील दोन-तीन दिवस तापमानात घट होण्याची शक्यता नाही. मात्र, गुरुवारनंतर तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. पुढील तीन-चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

सध्या आकाश कोरडे आहे. आर्द्रता वाढली असून, थेट सूर्यप्रकाश पृथ्वीवर येत असल्याने तापमानाचा पारा वाढला आहे. तापमानवाढीचे एक विशिष्ट कारण सांगता येणार नाही; परंतु दुपारच्या वेळी तापमानात वाढ जाणवत आहे.

Weather Update
Palolem Beach Goa: पाळोळे बीचचा जगभर डंका! जगातील टॉप 25 समुद्रकिनाऱ्यांमध्ये पटकावलं सहावं स्थान; आशियातील ठरला नंबर वन बीच

म्हापशात सर्वाधिक तापमान!

एका खासगी वेधशाळेच्या आकडेवारीनुसार, ९ नोव्हेंबर रोजी देशात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झालेल्या पाच ठिकाणांमध्ये म्हापशाचा समावेश आहे. म्हापशात ३८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कोविलंगुलम (तामिळनाडू) येथे सर्वाधिक ४० अंश सेल्सिअस, तर कारवार येथे ३९.२ अंश सेल्सिअस, म्हापशात ३८.८ अंश सेल्सिअस, दिसा (गुजरात) येथे ३८.६ अंश सेल्सिअस, तर भुज (गुजरात) आणि वेंगुर्ला येथे ३८.२ अंश सेल्सिअस नोंद झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.