Goa Weather Update
Goa Weather UpdateDainik Gomantak

Goa Weather Update: राज्यात हवामान कोरडे; पणजी, मुरगावात सर्वाधिक तापमानाची नोंद

Goa Weather Update: भारतीय हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने वर्तवलेल्या शक्यतेनुसार पुढीत सात दिवस राज्यात हवामान कोरडेच राहणार आहे.

Goa Weather Update

गोव्यात सर्वत्र हवामान कोरडे असून, गेल्या 24 तासांत मुरगाव आणि पणजीत सर्वाधिक 32.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर, 23.5 अंश सेल्सिअस सर्वात कमी तापमान नोंदविण्यात आले आहे.

भारतीय हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने वर्तवलेल्या शक्यतेनुसार पुढीत सात दिवस राज्यात हवामान कोरडेच राहणार आहे.

गोवा वेधशाळेच्या दैनंदिन वार्तापत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, राजधानी पणजीत सर्वाधिक 32.2 अंश सेल्सिअस तर सर्वात कमी 23.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

उत्तर आणि दक्षिण गोव्यात 13 ते 18 मार्च या काळात मुख्यत: हवामान कोरडे राहणार असून, पुढील तीन दिवसात तापमानात मोठा बदल दिसून येणार नाही, असे वार्तापत्रात म्हटले आहे.

Goa Weather Update
Sania Mirza In Goa: 'शोएब'सोबत घटस्फोट झाल्यानंतर सानिया गोव्यात काय शोधतेय? इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत

उन्हामुळे अंगाची लाही - लाही

राज्यात तापमानाचा पारा चढल्याने सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणविण्यास सुरुवात होत आहे. रस्त्याने थोडे पायी अंतर चालल्यास अंगावरुन घामाच्या धारा वाहत आहेत. गर्मीमुळे घशाला कोरड पडत असून, नागरिकांचे पाय शीतपेय घेण्यास प्राधान्य देत आहेत.

रस्त्यावर बर्फाचे गोळे, सरबत, उसाचा रस यासह विक्री करणारे गाडेधारक दिसत आहेत. उन्हाचा चटका बसत असल्याने शीतपेयांच्या मागणीत वाढ झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com