Sania Mirza In Goa: 'शोएब'सोबत घटस्फोट झाल्यानंतर सानिया गोव्यात काय शोधतेय? इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत

Sania Mirza In Goa: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिकसोबत घटस्फोट झाल्यापासून सानिया मिर्झा पुन्हा खूप चर्चेत आली.
Sania Mirza In Goa
Sania Mirza In GoaDainik Gomantak

Sania Mirza In Goa

भारताची माजी टेनिस स्टार सानिया मिर्झा सतत चर्चेत असते. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिकसोबत घटस्फोट झाल्यापासून सानिया मिर्झा पुन्हा खूप चर्चेत आली.

सानिया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते, अलिकडेच तिने गोव्यातून एक पोस्ट शेअर केली असून, तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

सानिया मिर्झाने नुकतीच सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. सोमवारी, 11 मार्च रोजी सानिया मिर्झाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक अतिशय सुंदर फोटो शेअर केला आहे.

या फोटोसोबत सानिया मिर्झाने दिलेले कॅप्शन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सानियाच्या फोटो कॅप्शनमुळे चाहत्यांमध्ये तिच्याबद्दलच्या पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

सानिया मिर्झाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये सानिया मिर्झा खूपच सुंदर दिसत आहे.

Sania Mirza In Goa
Goa-Lakshadweep flight: गोव्यातील Fly91 चे गोवा ते लक्षद्वीप पहिले उड्डाण, दोन शहरांसाठी थेट विमानसेवा लवकरच

सानियाने या फोटोसोबत एक सुंदर कॅप्शन सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यात त्यांनी फाईंडिंग पीस इन सिम्पलीसिटी ऑफ व्हाईट लिहिले.

सानिया मिर्झा सध्या गोव्यात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सानिया मिर्झा एका ॲड शूटसाठी गोव्यात गेली आहे. शोएब मलिकसोबत घटस्फोट घेतल्यानंतर सानिया मिर्झा आपल्या मुलासह भारतात परतली.

सानिया मिर्झाने 2010 मध्ये शोएब मलिकशी लग्न केले होते. आता तब्बल 14 वर्षांनंतर त्यांचे नाते तुटले आहे. शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदची जीवनसाथी म्हणून निवड केली आहे.

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांनाही एक मुलगा देखील आहे. सानियाने आपल्या मुलाचे नाव इझान ठेवले आहे. सानिया मिर्झा याआधी तिचा पती शोएब मलिक आणि मुलगा इझानसोबत दुबईत राहत होती. मात्र घटस्फोटानंतर ती मायदेशी परतली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com