Weather Update: राज्‍यात पुन्‍हा 'मुसळधार' पाऊस, आतापर्यंत 55 इंचांपेक्षा अधिक पावसाची नोंद

Heavy Rainfall Goa: इंचाच्‍या अर्धशतकानंतर मंदावलेल्‍या पावसाने रविवारी सायंकाळनंतर पुन्‍हा जोर धरला. राजधानी पणजीसह सर्वच भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली.
Goa Weather Update
Goa Weather UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: इंचाच्‍या अर्धशतकानंतर मंदावलेल्‍या पावसाने रविवारी सायंकाळनंतर पुन्‍हा जोर धरला. राजधानी पणजीसह सर्वच भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. राज्‍य हवामान विभागाने सोमवारपासून पुढील सहा दिवस पाऊस न होण्‍याचा अंदाज वर्तवला आहे. परंतु, रविवारच्‍या पावसाचा अंदाज घेतल्‍यास सोमवारपासून पावसात सातत्‍य राहण्‍याची शक्‍यता आहे.

यंदाच्‍या मान्‍सून हंगामात १ जून ते २ ऑगस्‍ट या काळात राज्‍यात एकूण ५२.४४ इंच पावसाची नोंद झालेली आहे. रविवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्‍याने तो ५५ इंचांपलीकडे गेला असण्‍याची शक्‍यता आहे. २०२५ मध्‍ये या काळात ७८.२३, तर २०२४ मध्‍ये तब्‍बल १२१.३८ इंच पाऊस पडलेला होता. त्‍यामुळे गेल्‍या दोन वर्षांच्‍या तुलनेत यंदाच्‍या पावसात मोठी घट असून, सरासरीतील तूटही ३४ टक्‍क्‍यांची आहे.

Goa Weather Update
Goa Forest Rights Claims: राज्‍यातील 30 टक्‍केच वन हक्‍क दावे निकाली, 1,901 दावे फेटाळले; 1,270 जणांना सनदांचे वितरण

यंदा राज्‍यात मान्‍सूनचा पाऊस वेळेत म्‍हणजेच ५ जून रोजी दाखल झाला. परंतु, त्‍यानंतर त्‍याने वारंवार उसंत घेतली. त्‍यामुळे गेले काही दिवस पुन्‍हा राज्‍यात उन्‍हाळा सुरू असल्‍याचा भास होत होता. पावसाने पुन्‍हा विश्रांती घेतल्‍याने शेतकऱ्यांमध्‍ये धास्‍ती पसरली होती. पण, रविवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्‍याने शेतकऱ्यांत समाधान पसरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com