Goa Weather: हवामान बदलामुळे काजू पिकाला यंदा उशीर! उत्पादकांच्या पदरी पुन्हा निराशा येण्याची शक्यता

Goa Weather Impact Cashew Harvest Feni Production: गोव्यातील महत्त्वाच्या पिकांपैकी एक असलेल्या काजू उत्पादनाला यंदा काहीसा उशीर झाला आहे. सर्वसामान्यपणे फेब्रुवारीच्या मध्यात काजूला काही प्रमाणात का होईना सुरूवात होत असे.
Goa Weather
Goa Weather Impact Cashew Harvest Feni ProductionDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Weather Impact Cashew Harvest Feni Production 2025

पणजी: गोव्यातील महत्त्वाच्या पिकांपैकी एक असलेल्या काजू उत्पादनाला यंदा काहीसा उशीर झाला आहे. सर्वसामान्यपणे फेब्रुवारीच्या मध्यात काजूला काही प्रमाणात का होईना सुरूवात होत असे. हुर्राकही दाखल होत असे. परंतु यंदा उशिरामुळे काजू उत्पादकांसह फेणी व्यवसायावरही परिणाम होत आहे.

कृषी संचालनालयाचे अधिकारी दत्तप्रसाद देसाई यांनी सांगितले की, यंदा अनेक भागात काजूला (Cashews) चांगला मोहर आला आहे. त्यामुळे जरी हंगाम सुरू व्हायला उशीर होत असला तरीही पुढील काळात हवामान चांगले राहिले तर निश्‍चित उत्पादन चांगले होऊ शकते.

Goa Weather
Goa Weather Update: गोमंतकीयांनो काळजी घ्या! राज्यात उन्हाचा कडाका वाढला; तापमान 37.4 अंशांवर

कृषी संचालनालयाचे अधिकारी दत्तप्रसाद देसाई यांनी सांगितले की, यंदा अनेक भागात काजूला चांगला मोहर आला आहे. त्यामुळे जरी हंगाम सुरू व्हायला उशीर होत असला तरीही पुढील काळात हवामान चांगले राहिले तर निश्‍चित उत्पादन चांगले होऊ शकते.

राज्यात तापमान वाढ आणि हवामान बदलांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. यंदा काजू हंगामाला उशीर झाल्याने बोंडू उपलब्ध नाहीत त्यामुळे मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आम्हाला फेणी उत्पादन घेणे सुरू करावे लागेल. आम्ही सध्या गोव्यातीलच बोंडू वापरून फेणीचे उत्पादन घेतो. परंतु ही स्थिती अशीच कायम राहिली तर भविष्यात कदाचित नाईलाजाने आम्हाला परराज्यातून बोंडू आणून फेणीचे उत्पादन घेण्याची वेळ येऊ शकते.

यश सावर्डेकर, युवा उद्योजक (गोंयची फेणी)

Goa Weather
Goa Weather: गोव्यात उष्णतेचा पारा चढला; राज्याला वाढत्या तापमानाचा चटका

गतवर्षी बोंडू परराज्यांतून

मागील तीन-चार वर्षातील काजूचे उत्पादन पाहिले असता समजते की, काजूच्या उत्पादनात सातत्त्याने घट होत आहे. त्यामुळे यंदाही काजू उत्पादकांना निराशाच येण्याची शक्यता आहे. अनेक फेणी उत्पादकांना गेल्यावर्षी आवश्‍यकतेनुसार बोंड मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांना शेजारील कर्नाटक आणि महाराष्ट्रातून (Maharashtra) बोंडू आणून फेणीचे उत्पादन घ्यावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com