Pernem Water Problem: अन्यथा पेडणे पाणी विभागावर घागर मोर्चा

हरमलवासीयांचा इशारा : चार दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
Pernem Water Problem
Pernem Water ProblemGomantak Digital Team
Published on
Updated on

Pernem Water Problem: हरमल पंचायत क्षेत्रात वरचावाडा परिसरात मागच्या दोन-चार महिन्यांपासून पाण्याचा लपंडाव सुरू आहे. नळांना पाणी येत नाही.

परंतु पाण्याची बिले नियमित येतात. काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करतानाही मतभेद केला जात आहे. यावर सरकारने योग्य तो तोडगा काढून दिवसाआड किमान दोन तास तरी आम्हाला पाणीपुरवठा करावा.

चार दिवसांच्या आत जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर पाणी विभाग पेडणे कार्यालयावर घागर मोर्चा नेण्याचा इशारा स्थानिक पंच रजनी इब्रामपूरकर यांनी ग्रामस्थांतर्फे दिला.

पेडणे तालुक्याचा विचार केला असता ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासूनच पाणीटंचाईला सुरुवात झालेली आहे. नियमित पाणी सोडाच, दिवसाआडही नळांना पाणी येत नाही.

पाणी विभागातर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. ज्या ठिकाणी रस्ता आहे. त्या ठिकाणी परिसरात टँकरचं पाणी मिळते, ज्या ठिकाणी टँकर जायला रस्ता नाही, त्यांना पाणीपुरवठा कसा करणार. तालुक्यातील एकूण २०ही ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये दिसून येते.

Pernem Water Problem
Goa Traffic Rule: भावांनो... एक जूनपासून वेगावर मर्यादा ठेवा!

सहनशीलता संपली

हरमल पंचायत क्षेत्रातील वरचावाडा या भागात सहा-सहा महिने, काही ठिकाणी पंधरा दिवस, काही ठिकाणी महिना-दोन महिने पाण्याचा पत्ताच नाही.

पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले, त्यांची भेट घेतली, त्यांना लेखी निवेदन दिले तरीही पाण्याचा पत्ताच नाही. आता ग्रामस्थांची सहनशीलता संपलेली आहे, असे स्थानिक पंच रजनी इब्रामपूरकर यांनी सांगितले.

Pernem Water Problem
Govind Gaude: एसटी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न

मागच्या कित्येक दिवसांपासून या परिसरात ज्या ज्येष्ठ महिला आहेत. त्या विहिरीवरून पाणी आणताना दिसत आहेत. हे चित्र बघितल्यानंतर मनाला खंत वाटते.

गावातील विहिरींतील गाळ उपसून काढला; परंतु त्यांना पाणी नाही. निदान आता तरी सरकारने नियमित नाही तरी दिवसाआड किमान दोन तास तरी पाणीपुरवठा करण्याची गरज आहे.

रजनी इब्रामपूरकर, पंचसदस्य, हरमल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com