Jal Jeevan Mission: जलसंपदा ही गावाची खरी श्रीमंती- सुभाष शिरोडकर

Goa News: मयेमध्ये दोन वर्षांत दहा कोटींची कामे, जलस्रोतमंत्र्यांची ग्वाही..
Jal Jeevan Mission | Subhash Shirodkar
Jal Jeevan Mission | Subhash ShirodkarDainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim: जलसंपदा ही गावाची खरी श्रीमंती आहे. जलसंपत्तीचे संवर्धन ही काळाची गरज आहे. केंद्र सरकारच्या ‘जल जीवन मिशन’अंतर्गत प्रत्येकाने जलसंवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.

येत्या दोन वर्षांत जलस्रोत खात्यातर्फे मये मतदारसंघात 5 ते 10 कोटी रुपयांची विकासकामे करण्यात येतील. युवकांनी केवळ सरकारी नोकरीच्या मागे न लागता, शेती, मत्स्य आदी व्यवसायांत पुढे येऊन देश आत्मनिर्भर बनविण्यासाठी योगदान द्यावे, असे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

Jal Jeevan Mission | Subhash Shirodkar
Goa Port News: पर्यटनासाठी लाभदायी ठरेल 'टर्मिनल इमारत'

शुक्रवारी 23 सप्टेंबरला शिरोडकर मये मतदारसंघातील समस्या जाणून घेण्यासाठी येथे आले होते. आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या उपस्थितीत मये पंचायत सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीवेळी जलस्रोत खात्याचे वरिष्ठ अभियंता के. पी. नाईक, ज्ञानेश्वर सालेलकर, जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत, शंकर चोडणकर आणि मयेचे सरपंच दिलीप शेट उपस्थित होते. या बैठकीस मतदारसंघातील विविध पंचायतींच्या सरपंच, पंचांनी मंत्र्यांसमोर त्या-त्या भागातील समस्या मांडल्या.

जलशुद्धीकरण प्रकल्प हवा

मये मतदारसंघात काही भागात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. लोकांना पाण्यासाठी पर्यायी सुविधांवर अवलंबून राहावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाची गरज आहे.

Jal Jeevan Mission | Subhash Shirodkar
Goa Crime : पुन्हा अपहरणाची अफवा; आणखी एकाला जमावाकडून बेदम चोप

सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांच्याकडे तसा प्रस्ताव दिला असून मंत्री सुभाष शिरोडकर यांनीही हा प्रस्ताव मार्गी लागण्यासाठी लक्ष घालावे, अशी मागणी आमदार प्रेमेंद्र शेट यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com