Canacona: काणकोणातील बंधारे खुले, संभाव्य धोका टाळण्यासाठी घेतला निर्णय

canacona river bandharas opened before monsoon: काणकोणातील नद्यांवरील पाणी अडविण्यासाठी उभारलेले बहुतांश बंधारे खुले करण्यात आले आहेत.
Canacona
CanaconaDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: काणकोणातील नद्यांवरील पाणी अडविण्यासाठी उभारलेले बहुतांश बंधारे खुले करण्यात आले आहेत. पावसाळ्यापूर्वी बंधारे उघडून त्यांच्या परिसरातील नदीपात्र स्वच्छ करणे आवश्यक असते. बंधारे उभारणे आणि खुले करणे हे काम कंत्राटदारामार्फत करण्यात येते. बंधारे खुले करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. अवकाळी पावसामुळे हे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे.

संभाव्य धोका टाळण्यासाठी बंधाऱ्यांतील फळ्या त्वरित काढाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. जून महिना सुरू होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना हे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. काणकोणात तळपण नदीचे मुख्य पात्र आणि उपनद्या, गालजीबाग नदी तसेच मुडकुड नदीवर ७० हून अधिक बंधारे आहेत. यापूर्वी बंधाऱ्यांमध्ये पाण्याची पातळी वाढल्याने खोतीगाव परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती.

काणकोणात गालजीबाग नदीवरील भटाबांध आणि माशे नदीवरील माशे येथे खारे पाणी नदीच्या वरच्या पात्रात शिरू नये म्हणून बंधारे उभारले जातात. मात्र, पावसाळ्यापूर्वी हे बंधारे खुले केले जातात, अशी माहिती जलस्रोत खात्याच्या सहाय्यक अभियंत्यांनी दिली.

Canacona
Goa Noise Pollution: ध्वनिप्रदूषण नियमांची 'ऐशीतैशी', कारवाईत पक्षपातीपणा; किनारी भागातील स्थानिकांचा आरोप

काणकोणातील नदीचे वरचे पात्र खाऱ्या पाण्यापासून संरक्षित ठेवण्यासाठी गालजीबाग नदीवरील भटाबांध, बाबरे खाडी आणि वाकडे न्हंय येथे तीन बंधारे उभारण्यात आले आहेत. मात्र, हे तीन बंधारे अद्याप खुले करण्यात आलेले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com