Water Issue In Goa: मुबलक पाणी मिळणार; पण कमीत कमी दोन वर्षे तरी वाट पहावी लागणार..

Water Issue In Goa: सद्याच्या 800 एमएलडी वरुन 1000 एमएलडी पर्यंत वाढ करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.
Subhash Shirodkar
Subhash ShirodkarDainik Gomantak

Water Issue In Goa: उन्हाळ्याची चाहूल लागली कि राज्यात पाणी टंचाईचे सावट दिसू लागते. दरवर्षी गोवा राज्य सरकारला लाखों रुपयांचा पर्यटन कर देणाऱ्या उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या काही भागातील लोकांना तसेच व्यवसायिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सरकारवर नव्हे तर पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खाजगी टँकरवर अवलंबून राहावे लागते ही येथील सध्याची कटु परिस्थिती आहे. मात्र याच संदर्भात एक महत्वाची अपडेट हाती येतेय.

2025 पर्यंत राज्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यात वाढ करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सद्याच्या 800 एमएलडी वरुन 1000 एमएलडी पर्यंत वाढ करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यानी काल मडगावात सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी सुद्धा या कामाला आपली संमती दिली असुन त्यासाठी लागणाऱ्या निधिची तरतूद करण्याचे आश्र्वासनही त्यानी दिल्याचे मंत्री शिरोडकर यानी सांगितले.

Subhash Shirodkar
Mapusa News: गिरी सर्व्हिस रोडच्या 'त्या' प्रकारावर प्रशासनाची नजर; घटनेची तातडीने चौकशी करणार- सरपंचांचे आश्वासन

सर्वत्र लोकांना 24 तास पाण्याचा पुरवठा होत नाही. तरी सुद्धा या प्रयत्नामुळे कमीत कमी आठ तास तरी लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे शक्य होईल असे त्यानी सांगितले.

मात्र या प्रयत्नांना तात्काळ यश येणार नाही. त्यासाठी कमीत कमी दोन वर्षे तरी वाट पहावी लागणार आहे अशी पुष्टीही मंत्र्यांनी जोडली.

साळ नदीतुनही 250 एमएलडी पाण्याचा पुरवठा करण्याचा प्रकल्प सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जलस्त्रोत मंत्र्यांनी दिली.

या दोन्ही प्रकल्पांमुळे लोकांना नियमित व सुरळीत पाणी पुरवठा सरकारला करता येईल असा विश्र्वास शेवटी त्यानी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com