Mapusa News: म्हापसा पणजी महामार्गावरच्या गिरी फ्लायओव्हरच्या सर्व्हिस रोडवर सध्या काही मासे विक्रेते पहाटेच्या यावेळेत मासेविक्री करत आहेत.
या घटनेमुळे याठिकाणी सांडपाणी आणि दुर्गंधी निर्माण होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून होत आहेत.
सदर प्रकार मागील काही दिवसांपासून होत असून सकाळी 5 ते 8 या वेळेत या ठिकाणी अनेक मासे विक्रेते दुचाकींवरून माशांनी भरलेल्या क्रेटी आणून विक्रीसाठी ठेवतात.
ग्राहकांना ताजे मासे मिळत असल्याने याठिकाणी ग्राहकांची झुंबड उडते. मात्र या प्रकारामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून सर्व्हिस रोडवर मासे विक्री होत असल्याने काही वेळा वाहतूक कोंडी देखील होते.
तसेच अशा प्रकारे उघडल्यावर मासे विक्री होत असल्याने लोकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत असल्याच्या तक्रारी सुरु झाल्या आहेत.
या प्रकरणी गिरी सरपंच- बाबाजी गाडेकर आणि पंचायत सदस्यांनी घटनेची तातडीने चौकशी करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
तसेच सालीगावचे आमदार केदार नाईक यांनीही या प्रकरणी लक्ष घालण्यात येणार असल्याचे संगितले आहे. सदर मासे विक्रेते परप्रांतीय आहेत की गोवेकर याचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान काही महिन्यांपूरी शिवोली,चोपडे-शिवोली येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला बसून रात्री उशिरापर्यंत मासे विक्री करणाऱ्या स्थानिक मच्छीमारांना हणजूण पोलिसांनी समज देऊन तेथून हटविले.
स्थानिक लोकांनी याबाबतीत तक्रार केल्यानेच कारवाई करावी लागल्याची माहिती हणजूणचे पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी सांगितले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.