'गोव्याला हवेत असे श्रीमंत पर्यटक'

ड्रग्ज सेवन करणारे आणि गोव्याची प्रतिमा खराब करणारे लोक आम्हाला राज्यात नको आहेत.
Goa Tourism Minister Manohar Azgawkar
Goa Tourism Minister Manohar AzgawkarDainik Gomantak
Published on
Updated on

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारण आर्यन खान प्रकरणावरुन (Aryan Khan case) चांगलचं तापत आहे. या प्रकरणाच्या माध्यमातून राजकीय पुढारी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. यातच आता गोव्याचे (Goa) पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर (Manohar Ajgaonkar) यांनी मंगळवारी पुन्हा एकदा आपल्या राज्यात अंमली पदार्थांचे सेवन करण्याविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की, ड्ग्ज सेवन करणारे आणि गोव्याची प्रतिमा खराब करणारे लोक आम्हाला राज्यात नको आहेत.

तथापि, आजगावकर पुढे म्हणाले की, पर्यटकांनी गोव्यात येऊन बसमध्येच आपले अन्न शिजवावे अशी आमची कदापि इच्छा नाही. गोवा सरकार 'सर्वात श्रीमंत पर्यटक' शोधत आहे. सर्व पर्यटकांचे गोव्यामध्ये स्वागत आहे, परंतु त्यांनी गोव्याच्या संस्कृतीचा आदर करावा.

Goa Tourism Minister Manohar Azgawkar
Breaking News: आर्यन खानला दिलासा नाहीच, अखेर मुक्काम पोस्ट जेलचं

दरम्यान, आजगावकर पुढे राज्यात सुरु असलेल्या अंमली पदार्थांच्या सेवनविरोधातही बोलले. त्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईत एका हाय-प्रोफाइल क्रूझ पार्टीचा भांडाफोड केला होता. गोवा सरकारच्या ड्रग्स घेणाऱ्या पर्यटकांना रोखण्याच्या योजनेच्या प्रश्नाला उत्तर देताना, आजगावकरांनी असा इशारा दिला होता की, राज्य सरकार अशा पर्यटकांवर कडक कारवाई करेल. गोवा टुरिझम असोसिएशन आणि जीसीसीआयने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरु करण्याची विनंती केली आहे. गोवा सरकारच्या अधिकाऱ्यांना सूचना देताना आजगावकर म्हणाले, आपल्याला ड्रग्ज घेणारे लोक राज्यामध्ये नको आहेत.

Goa Tourism Minister Manohar Azgawkar
आर्यन खानला दिलासा नाहीच, 20 ऑक्टोबरपर्यंत कोठडी

मुंबई क्रूझमधील भंडाफोड

2 ऑक्टोबर रोजी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या Cordelia क्रूझ शिपवर एका हाय-प्रोफाईल ड्रग पार्टीचा पर्दाफाश केला होता. यामधून थोड्याफार प्रमाणात कोकेन, मेफेड्रोन, चरस, हायड्रोपोनिक वीड, MDMA आणि रोख रुपये NCB कडून जप्त करण्यात आले होते. सूत्रांनुसार, झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीचे अधिकारी सीआयएसएफ कडून कथित ड्रग पार्टीबद्दल सूचना मिळाल्यानंतर प्रवाशांच्या वेशात क्रूझ शिपमध्ये दाखल झाले होते.

पर्यटकांवर कडक कारवाई केली जाईल

एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या मते, आरोपी, जहाजावरील सुमारे 1,200 लोकांसह, पार्टीसाठी जात होते. आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा या आठ जणांना अटक करण्यात आली, तर इतर सहा जणांना एनसीबीने सोडून दिले. आजपर्यंत, मनीष भानुशाली आणि के.पी. गोसावी यांच्यासह नऊ स्वतंत्र साक्षीदारांच्या आधारे एनसीबीने 20 लोकांना अटक केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com